डी.जे.अंगावर आला,दोघे मयत,अनेक गंभीर जखमी
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आनंदाच्या क्षणाचे एका क्षणात दुखात रुपांतर झाल्याची घटना आता समोर आली आहे.धांदरफळ येथील नवरदेव लग्नासाठी निघाला असता निघालेल्या नवरदेवाच्या मिरवणुकीत नियंञणा बाहेर झालेल्या डिजे वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने अचानक वेग वाढवल्याने त्याखाली सुमारे 10 ते 15 वराती चिरडले गेले.काही क्षणातच हा प्रकार झाला दुर्दैवी घटनेत दोन व्यक्तींचा जागेवर मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर असल्याच समजत आहे.यामुळे मंगल सोहळ्यावर शोककळा पसरली. जखमींना तातडीने संगमनेरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदत केली.याबाबत समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना आज सायंकाळी ४वाजेच्या सुमारास धांदरफळ यथे घडली. येथील किसन रंगनाथ खताळ यांच्या मुलाचे शुक्रवारी उद्या रोजी रणखांब येथे लग्न आहे. त्यासाठी आज दुपारी नवरदेवाची वाजतगाजत पाठवणी सुरु होती. ही मिरवणूक ऐन रंगात आलेली असतांना अचानक मिरवणुकीतील डिजेच्या.एम.एच16/ए.ई.2097 वाहनामुळे हा अपघात झाला आहे.त्यामुळे मित्राचे, नातेवाईकाचे लग्न म्हणून आनंदा...