अकोले-निळवंडेच्या डाव्या कालव्याला दशरथ सावंत यांचे नाव द्या-संतोष नाईकवाडी
अकोले-अकोले तालुक्यातील राजकीय,सामाजिक,कृषी चळवळीत योगदान दिलेल्या दशरथ सावंत यांचे नाव निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला देण्यात यावे अशी मागणी संतोष नाईकवाडी यांनी केली आहे त्यांनी म्हटल आहे की 1976 च्या क्रांतिकारी लढ्यात दशरथ सावंत साहेब हे तुरुंगात गेले होते.त्यानंतर बी.जे खताळ साहेब यांनी निळवंडे धरणाचे म्हाळादेवी येथे पाटबंधारे मंत्री बी जे खताळ साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन केले. तद्नंतर तुरुंगातून ज्येष्ठ नेते दशरथ रावजी सावंत साहेब सुटून आल्यानंतर यांनी स्थानिक रहिवासी यांच्या मदतीने म्हाळादेवी निळवंडे येथील ग्रामस्थांच्या मदतीने धरण जागा बदलाची मोहीम हाती घेतली.व या सर्व गावातील सुपीक जमीन वाचून दिगंबर गाव मधील कोरडवाहू जास्त ची जमिन तसेच निळवंडे मधील व निंब्रळ मधील काही अंशी कोरडवाहू जमिनी जाऊन आज त्या ठिकाणी निळवंडे धरणाची निर्मिती झाली. आज आनंद या गोष्टीचा आहे की म्हाळादेवी या गावीचे आज धरण बदलामुळे सुजलाम सुफलाम झाली आहे.लाभक्षेत्रातील तीन ते चार गावे आज सुपीक व प्रकल्पात जाण्या पासून वाचल्याचे श्रेय फक्त दशरथरावजी सावंत साहेब यांच्यामुळे आहे....