अकोले-समाजिक कार्यकर्ते सागर सतिश तिकांडे यांच्या प्रयन्नातुन व ग्रामपंचायत टाकळी,सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्या प्रयन्नातुन महालक्ष्मी मंदिर व मारुती मंदिराचा(खालची टाकळी) "क"वर्गात समावेश
अकोले-अकोले तालुक्यातील टाकळी गावातील महालक्ष्मी मंदिर व मारुती मंदिर(खालची टाकळी) या मंदिरांचा जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत "क"वर्गात समावेश झाला आहे.टाकळी गावातील मंदिर याचा "क"वर्गात समावेश व्हावा म्हणून टाकळी गावचे सामाजिक कार्यकर्ते सागर सतिश तिकांडे यांनी विशेष योगदान दिले आहे या संदर्भातील संपुर्ण पाठपुरावा हा टाकळी गावातील सामजिक कार्यकर्ते सागर सतिश तिकांडे यांनी अहिल्यानगर येथिल प्रसाशकिय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवत पोलिस स्टेशन अकोले आमदार किरण लहामटे,जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे,माजी आमदार वैभवराव पिचड यांच्याशी वारंवार संपर्क करत हा पाठपुरावा केला होता. .हा प्रस्ताव मंजूर होणे कामी आमदार किरण लहामटे,जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे,ग्रामपंचायत टाकळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदिंचे विशेष सहकार्य झाले आहे.सामाजिक कार्यकर्ते सागर तिकांडे यांच्या आलेल्या प्रयन्नांमुळे टाकळी गावातील ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ही जिल्हाधिकारी कार्या...