Posts

Showing posts from April, 2024

अकोले-शिर्डी लोकसभा मतदार संघात मा. भाऊसाहेब वाकचौरे शिवाय पर्याय नाही.- श्री. संदिप भाऊसाहेब शेणकर.

Image
अकोले-शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनेक गोष्टींमुळे महत्वाचा मनाला जातो त्यातल्या त्यात भंडारदरा व निळवंडे धरणांचा पाणीवाटपाचा मुद्दा नेहमीच वादाचा ठरत आलेला आहे,यापुढे निळवंडेच्या पाटाचे पाण्याचे आणि नदीचे पाणी असे नवीन वाटपाचे वाद निर्माण होतील, त्याचप्रमाणे पाटाच्या बाजूच्या शेतकऱ्यांचे उपळ्याचे प्रश्न निर्माण होतील आणि अश्या या वादाच्या प्रश्नांनी वेढलेल्या मतदारसंघात मतदारांची बाजू ठामपणे मांडणारा आणि मतदारांशी नियमित जोडला गेलेला खासदार असणे आवश्यक आहे. आणि आज असा एकच उमेदवार शिर्डी लोकसभा मतदार संघात आहे, जो मतदारांच्या हक्काचा माणूस आहे, आणि त्यांची ओळख त्यांच्या कामांमुळेच झालेली आहे, ते नम्र व संयमी व्यक्तीमत्व म्हणजेच मा. भाऊसाहेब वाकचौरे साहेब, मुळातच त्यांना मतदारसंघ तोंडपाठ आहे प्रत्येक खेडोपाडी त्यांच्या पूर्वीच्या 5 वर्ष्यांच्या कार्यकाळात त्यांचे कामे व कामातून ओळख पोहोचलेली आहे आणि म्हणून तरुण पिढीत मा. भाऊसाहेब वाकचौरे यांची क्रेझ पाहवयास मिळते, त्याचबरोबर वयोवृधांमध्ये तर "आपला माणूस आपल्यासाठी" हिच ओळख भाऊसाहेब वाकचौरे यांची मतदारांमध्ये आहे. या...

अहेरी,जे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून मंचर्ला कुटुंबियांना मदतीचा हात

Image
अहेरी:-आलेल्या अडचणींवर मात करून दुःखाचा डोंगर सर करून आपल्याला पुढे जायचं आहे.या प्रवासात आम्ही तुमच्या साथीला आहोत.अश्या शब्दात गडचिरोलीचे माजी पालकमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी देवलमरी येथील घर जळालेल्या मंचार्ला कुटुंबीयांना धीर देत मदतीचा हात देतांनाच त्यांनी भोगलेल्या वेदनांवर,त्यांच्या जखमांवर मायेची फुंकर घातली.अहेरी तालुका मुख्यालयपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमरी येथील मुतय्या मंचर्ला हे शेखर व संतोष या दोन मुलांसह राहतात.तिघांचीही स्वतंत्र घरे आहेत. २ मार्च रोजी रात्री जेवण करून सर्वजण आपापल्या घरी झोपी गेले.पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरांना आग लागली.आगीचे लोळ पाहून शेजाऱ्यांनी तिघांनाही जागे केले.त्यानंतर ते कुटुंबासह घराबाहेर पडले.या आगीत धान्य,कपडे,भांडी व इतर साहित्य जळून खाक झाले.आग आटोक्यात आणण्याची संधीही मंचर्ला कुटुंबियांना मिळाली नाही. या आगीमध्ये होतंच नव्हतं झालं आणि पिता-पुत्रांचा संसार उघड्यावर आला.याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावत...