अकोले-शिर्डी लोकसभा मतदार संघात मा. भाऊसाहेब वाकचौरे शिवाय पर्याय नाही.- श्री. संदिप भाऊसाहेब शेणकर.

अकोले-शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनेक गोष्टींमुळे महत्वाचा मनाला जातो त्यातल्या त्यात भंडारदरा व निळवंडे धरणांचा पाणीवाटपाचा मुद्दा नेहमीच वादाचा ठरत आलेला आहे,यापुढे निळवंडेच्या पाटाचे पाण्याचे आणि नदीचे पाणी असे नवीन वाटपाचे वाद निर्माण होतील, त्याचप्रमाणे पाटाच्या बाजूच्या शेतकऱ्यांचे उपळ्याचे प्रश्न निर्माण होतील आणि अश्या या वादाच्या प्रश्नांनी वेढलेल्या मतदारसंघात मतदारांची बाजू ठामपणे मांडणारा आणि मतदारांशी नियमित जोडला गेलेला खासदार असणे आवश्यक आहे. आणि आज असा एकच उमेदवार शिर्डी लोकसभा मतदार संघात आहे, जो मतदारांच्या हक्काचा माणूस आहे, आणि त्यांची ओळख त्यांच्या कामांमुळेच झालेली आहे, ते नम्र व संयमी व्यक्तीमत्व म्हणजेच मा. भाऊसाहेब वाकचौरे साहेब, मुळातच त्यांना मतदारसंघ तोंडपाठ आहे प्रत्येक खेडोपाडी त्यांच्या पूर्वीच्या 5 वर्ष्यांच्या कार्यकाळात त्यांचे कामे व कामातून ओळख पोहोचलेली आहे आणि म्हणून तरुण पिढीत मा. भाऊसाहेब वाकचौरे यांची क्रेझ पाहवयास मिळते, त्याचबरोबर वयोवृधांमध्ये तर "आपला माणूस आपल्यासाठी" हिच ओळख भाऊसाहेब वाकचौरे यांची मतदारांमध्ये आहे. याहिपुढे शिर्डी लोकसभा मतदार संघांचे राजकीय वातावरण देखील मा. भाऊसाहेब वाकचौरे यांना पोषक आहे, बोलायचंच झालं तर, अकोले तालुक्यातील 50 टक्के मतदार मा. शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा व 30 टक्के मतदार मा. उद्धवजी ठाकरे यांना मानणारा आणि थोडेफार मतदार आहेत वेगळ्या विचारसरनीचे तर त्यांतील काँग्रेसचे मतदार हे साहजिकच महाविकास आघाडीला मतदान करणार, संगमनेर तालुक्यातील बहुतांश मतदार हा काँग्रेस पार्टीला मानणारा आहे, आणि आज काँग्रेस पक्षात मा. बाळासाहेब थोरात यांना खुप वरच स्थान आहे, भविष्यात ते काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री/मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत यात तिळमात्र शंका नाही आणि म्हणून ही निवडणूक मा. बाळासाहेब थोरतांची राजकीय ताकद दर्शवणारी असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे, कारण काँग्रेसच्या उत्कर्षाताई रुपवते यांनी ऐन निवडणुकीच्या काळात, खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला, त्याचा राग काँग्रेस पक्ष कार्यकारणी, कार्यकर्ते व मतदारांमध्ये आहे, आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडून त्यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला जाईल,राहाता तालुक्यातील जनता जुलमी हुकूमशाहीला आणि घराणेशाहीला कंटाळलेली आहे, संगमनेर तालुक्यातील सहकाराप्रमाणे राहाता तालुक्यातील सहकार विकसित झालेला नाही, आजही अनेक प्रश्न जसेच्या तसेच आहेत आणि म्हणून त्याठिकाणी घोगरे यांच्या नेतृत्वाचा उदय झालेला आहे, आणि त्यामुळे तेथे महाविकास आघाडीला मोठे मतदान होईल त्याचप्रणाने कोपरगावमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांची मोठी ताकद असून त्या ठिकाणी आशुतोष काळे हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे आमदार होते परंतु त्यांनी बंडखोरी केल्यामुळे सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांसोबतच राहील ते या लोकसभेच्या निवडणुकीत आशुतोष काळे यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही व श्रीरामपूरमध्ये  आमदार लहू कानडे दोघेही काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचे मतदारसंघात कामे चांगले आहेत,त्यामुळे तेथेदेखील भाऊसाहेब वाकचौरे अनुकूल वातावरण असेल, तसेच नेवासा तालुक्यातील आमदार शंकरराव गडाख हे उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आहेत तेथे देखील भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर असतील एकंदरीत सर्व तालुक्यांच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला असता, आणि सदाशिव लोखंडे यांचा मागील 10 वर्षांचा कार्यकाळ पाहता मा. भाऊसाहेब वाकचौरे हेच शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार असतील असे मत संदिप भाऊसाहेब शेणकर यांनी व्यक्त केले.
संपादक-भाऊसाहेब साळवे,अकोले
      9689140440

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प