लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..
अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील घडलेल्या घटनेचा निषेध म्हणुन आज अकोले कोल्हार घोटी महामार्गालगत आज रास्ता रोको करण्यात आला.यावेळी कानडी बांधव मोठ्या संख्येने अकोले माहात्मा फुले चौक येथे जमले होते या आंदोलनात प्रामुख्याने शरद पवार,भाजप पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येन सहभागी झाल्याच चिञ दिसुन आल यामुळे या सामाजिक आंदोलनाला राजकीय वास आल्याच चिञ प्रथमदर्शनी दिसुन आल.आमदार विरोधी असणाऱ्या विरोधी पक्षातील मंडळींनी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या मतांचा फायदा घेण्यासाठीच हजेरी लावल्याची चर्चा अकोले तालुक्यात सुरु होती.आपल्या समाज्यातील एका व्यक्तीवर अन्याय झाला म्हणुन समाज म्हणुन संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला होता यावेळी कानडी समाज्याच्या वतीने आमदार किरण लहामटे यांनी समाज्याची माफी मागावी अशी कानडी समाज्याकडुन मागणी समोर आली आहे.माञ या आंदोलनासाठी लिंगदेव ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता माञ गावचे आंदोलन हे सामजिक स्तरावर विभागले गेल्याने लिंगदेव ग्रामस्थ तुरळक उपस्थित दिसले.यामुळे ओबिसी व मराठा या वादाचा अंतर्भाव या आंदोलनात ही दिसुन आला.दुसरीकडे महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी हे या आंदोलनासाठी अप्रत्यक्षपणे खाद्य व मुद्दे उपस्थित करण्यासाठी इन कॅमेरा समोर आल आहे.कोणी कधी उपस्थित राहायच,कोणाला भाषणातुन टोले द्यायचे याची भ्रमणध्वनी वरुन साधलेला संपर्क सर्वांच्या लक्षात येऊन गेला.यावेळी आमदार किरण लहमटे यांची प्रतिमा डॅमेज करण्याचा प्रयन्न सामाजिक आंदोलनात केल्याच चिञ समोर आल आहे.आमदार लहामटे यांनी केलेला प्रकार कुटुंब वगळता आजमीती मिडियात समोर येऊन खरा आहे हे सांगणारे लोक दिसत नाही असतील तर आमच्या माध्यामातून त्यांना जाहीर अव्हान आहे की आपण मिडियात समोर येऊन बोलणे अपेक्षित आहे.माञ विरोधी पक्ष पदाधिकारी,मुळा विभागातील शरद पवार गटाचे नेते हे शेतकरी यांचे नाव काय आहे हे विचारत होते यामुळे यांना सदर शेतकऱ्याचे नाव ही माहित नसताना माझ्या मुळा विभागातील लिंगदेव अस म्हणत भाषण करत होते हे ही या आंदोलनातील हास्यास्पद गोष्ट दिसुन आली.यावेळी माजी जि.प. सदस्य बाजीराव दराडे यांची भुमिका निर्णायक...बाजीराव दराडे यांच्यावर ज्यावेळी एका इसामाने ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता माञ आज आंदोलनात भाषणे ठोकणारी मंडळी ही त्यावेळी दराडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन पोलिस स्टेशनला दिसुन आली होती आज तीच मंडळी अल्पसंख्यांक व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन व सामाजिक आंदोलक नेते म्हणुन उपस्थित होती.माझ्यावर अन्याय झाला त्यावेळी हे पिचड,भांगरे, मेंगाळ यांनी भुमिका का मांडली नाही असा सवाल बाजीराव दराडे यांनी उपस्थित केला आहे.त्यांना हा प्रश्न विचारा असा सवाल पञकार बांधवांशी उपस्थित केला.यावेळी माझ्यावर झालेला अन्याय भांगरे व पिच घराण्याला दिसला नाही का?ंत्यावेळी माझ्या बरोबर का कोणी नव्हते,फक्त राजकीय संधीचा फायदा उठवणारे लोक का पुढे येत आहे? असा सवाल बाजीराव दराडे यांनी उपस्थित केला यावेळी राजयोग न्युजचे संदिप दातखिळे यांनी आपली प्रमाणिक भुमिका आज पर्यंत बजावली आहे माञ या आंदोलनाचा शेवट होत असताना प्रतिक्रिये दरम्यान संदिप दातखिळे यांच्या पञकारीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कानडी बांधवांनी घेराव घालत एकतर्फी पञकारीता करत असल्याचा आरोप केला.माञ लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन काम करणाऱ्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला गेला आहे.यावेळी शरद पवार गटाचे युवानेते अमित भांगरे यांनी पञकारीता करणाऱ्या पञकारांचा एकप्रकारे अवमान करत त्यांना कमी खेळण्याचा प्रयन्न केला आहे.अमित भांगरे यांनी पञकार संदिप दातखिळे यांनी काल मांडलेल्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला तसेच जाणीवपूर्वक पञकार बांधवाचे मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयन्न केला आहे.कोणत्याही आर्थिक पेड न्युज नसताना पञकार बांधवांना हा सर्वांच्या मदतीला जात असतो.यामुळे अमित भांगरे यांच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकण्याचा विचार पञकार संघटना विचारशून्य असल्याच समोर येत आहे आज पर्यंत अकोले तालुक्यात विरोधी पक्ष जगवण्याचे काम २०१९नंतर पञकार बांधवानी केले आहे माञ विरोधात बातमी केल्यानंतर राजकीय पाठबळ देत लोकांना पञकारांच्या अंगावर नेण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पञकार बांधवावर झाल्याने काही पञकार बांधवांनी याचा निषेध नोदंवला आहे.माञ आजच्या आंदोलनात दरम्यान कानडी समाज्याची भुमिका वगळता राजकीय व्देषाचीभावना व जि.प.समिकरणाची जातीय गणिते समोर आली आहेत.आमदार लहमटे हे एका उध्दघाटनाच्या साठी गेले असता हा अघटीत प्रकार घडला किंवा याचे वास्तवदर्शी चिञ,व्हिडिओ समोर न आल्याने हा प्रकार राजकीय व्देषातुन झाल्यावर लोक बोलत आहेत.ज्यांच्याकडे हा व्हिडिओ किंवा प्रत्यक्षदर्शी लोक पुढे का येऊन मिडियात समोर येत नाहीय?जर वाळीबा होलगीर यांच्यावर अन्याय झाला तर स्वतंत्रपणे येत मिडियात समोर येणार अपेक्षित आहे.माञ त्यांच्याकडून खरा प्रकार जाणुन घेण्याचा प्रयन्न केल्यास काही कार्यकर्ते त्यांना बोलता येत नाही,किंवा कुटुंबीय बोलण्यास टाळाटाळ करत आहे यामुळे जाणीवपूर्वक या प्रकरणाला काही दिवंसापुर्वी देवगाव प्रकरणासारखे राजकीय वळण देण्याचा प्रयन्न केला जात आहे का?असा सवाल अकोलेकर विचारत आहे.यावेळी मी पुरोगामी चळवळीचा कार्यकर्ता म्हणुन सांगणारे पोपट चौधरी यांना एक अज्ञात व्यक्ती बाजीराव दराडे यांना टोला मारा असा सल्ला देत असल्याने हे आंदोलन राजकीय होते की सामाजिक असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमदार डाॅ.किरण लहामटे यांची चूक झाली असेल तर नक्कीच त्यांच्यावर ताशेरे ओढणे गैर नाही,माञ जाणीवपूर्वक हे प्रकरण रंगवले जात आहे का?आज झालेल्या आंदोलनाला कानडी समाज्यातील कार्यकर्ते वगळता राजकिय हलचाली,उपस्थिती यामुळे सामाजिक आंदोलनाला राजकीय वास येत आहे.न्युज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे उपसंपादक किशोर मोहिते अकोले
क्रमशः -भाग-४



Comments
Post a Comment