अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सन 2024-25 चा गाळप हंगाम पूर्णत्वाकडे चालला आहे मात्र मार्च अखेरीस कारखान्याचे शेतकऱ्यांसोबतचे व्यवहार मात्र पूर्ण होताना दिसत नाहीत. मार्च अखेरचा कालावधी म्हणजे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्या, जिल्हा सहकारी बँका तसेच राष्ट्रीकृत बँका यांचे व्यवहार पूर्ण करायचे असतात, प्रत्येक शेतकऱ्याच एक आर्थिक गणित असत मात्र अकोले तालुक्याच्या या भाग्यलक्ष्मीच्या सारर्थ्यांमुळे शेतकऱ्यांचे गणिते कोलमडली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे, वास्तविक पाहता मार्च महिन्यात सर्वच साखर कारखान्यांनी एकही मस्टर राखून नं ठेवता नियमित ऊस उत्पादकांचे पैसे खात्यावर वर्ग करायला हवेत जेणे करून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, मात्र ते तर बाजूलाच अगस्ती कारखान्याचे भागातील 3 मस्टरचे ऊस पेमेंट देणे बाकी आहे, जे दिले ते पण 2500 रुपये प्रति मे टन प्रमाणे. मार्च अखेरीस शेतकरी तोट्यात गहू, कांदे एवढच नव्हे दुभती जनावरे विकतो पण पैसे रोख घेऊन कर्जे भरतो पण सर्वात मोठी शोकांतिका तर ही आहे कि एकतर प्रति टन 300-400 रुपये तोटा प्रति टन उसामागे खायचा आणि तरी पण पैसे वेळेत नाही हा कुठला व्यवहार,..?जेव्हा केंद्र सरकार कडून 94 कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले तेव्हा ज्याच्या परी त्याने मोठ मोठया बढाया मारल्या, मग आज कुठे गेले ते 94 कोटी, आणि काय फायदा झाला शेतकऱ्यांना तुमच्या 94 कोटींचा त्यांच्या नशिबी जे होत तेच आज पण आहे शेतकऱ्यांचे पेमेंट बाकी, कामगारांचे पेमेंट बाकी, मग प्रश्न हा पडतो कि ही भाग्यलक्ष्मी आहे पण कोणासाठी..? 
  वार्षिक सर्वसाधारण सभेत मा. आमदार महोदयांनी, तत्कालीन खातेप्रमुखांनी आणि कार्यकारी संचालकांनी केलेल्या भ्रस्टाचाराची चौकशी करून गुन्हे नोंदवण्याच्या सूचना केल्या, सूचना नव्हे आश्वासनच भर वार्षिक सर्वसाधारण सभेत दिल होत त्यावर मात्र संचालक मंडळाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही हे कोणीही ठामपणे सांगू शकत, मात्र आज देखील कारखाण्याच्या अनेक खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये परिस्थिती फारशी वेगळी नाही, त्यामुळे आता मला तरी एक शेतकरी म्हणून वाटत कि अगस्ती साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांनी आता अपेक्षा ठेवणं सोडून द्यावं, ही भाग्यलक्ष्मी नक्कीच आहे पण ती शेतकऱ्यांची नव्हे.असं मत संदीप भाऊसाहेब शेणकर यांनी मांडले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प