Posts

Showing posts from November, 2026

अकोले-गायकरांना भाजप प्रवेशाचे डोहाळे?वाचा बरच काही विश्लेषण...

Image
अहिल्यानगर जिल्हात जिल्हा बँकेचा निकाल बाहेर पडला अनेकांचा यात पराभव झाला तर खासदार लंके यांनी आपला गड राखल्याचे चिञ सध्या समोर येत आहे.माञ आता जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी सुजय विखे पाटिल यांचे नाव सध्या चर्चेत आहे.तरी माजी मंञी बाळासाहेब थोरात म्हणतील तोच चेअरमन होईल अशी चर्चा अहिल्यानगर मध्ये सुरु आहे,राजकिय बलाबल पाहता हे चिञ सष्ट होत आहे.थोरात आपल्या विश्वासू व्यक्तीला अध्यक्ष पदी बसवणार की उपाध्यक्ष पदी हे पाहणे आता अहिल्यानगर जिल्हात चर्चेचा विषय बनले आहे.सहाकरातील निवडणुक म्हणून राजकीय मतभेद बाजुला ठेऊन अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणुक पार पडली आहे माञ आता अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर दावा कोण करणार आणी यासाठी लाॅबिग होण्याची शक्यता नाकारली जात नाही. --------------- त्यातच अकोले तालुक्यात पिचड, भांगरे,गायकर हे एकञ आल्याने अकोलेत आता हे सगळे किती दिवस सोबत राहणार आणि आमदार किरण लहामटे यांना कसा शह अडिज वर्षात देणार हे पाहावे लागणार आहे की सहकाराची निवडणुक म्हणुन गायकर आपल्या पक्षाच्या आमदारासोबत पुन्हा सलगी करणार आणि आमदार किरण लहामटे हे गायकर यांना मनापासुन स्वीकारणार का ह...

अकोले_गर्दी,उत्साह,उत्सुकता आणी भविष्यातील राजकारणाचा खेळ

Image
अकोले तालुक्यातील जिल्हा बँकेसाठी मतदान झाले असुन या निवडणूक प्रक्रिये दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या आहेत.ठराव झालेले मतदार हे सहलीवरुन सकाळीच मतदानासाठी पोहचले तर दुसरीकडे आमदार किरण लहामटे हे एकाकी पडल्याच चिञ दिसुन आल आहे.आपल्याच पक्षात उभे दोन गट पडल्याने आमदार किरण लहामटे  यांच्या समोर पेच उभा  राहिला होता.माञ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या वारसानुसार ही लढत त्यांनी लढवली आहे.आमदार लहामटे यांना अपेक्षे पेक्षा जास्त मते पडतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.उद्या कोणाचाही गुलाल असला तरी आमदार लहामटे यांनी दिलेली एकाकी झुंजीची चर्चा सध्या अकोलेत सुरु आहे.सध्या अकोले जिल्हा बँकेच्या निमित्ताने अजित पवार पक्षात,गटात मराठा-आदिवासी असे दोन गट पडले आहेत.माञ विजयी होणारा उमेदवार हा ५८/६०-घेणार तर उरलेली मते असा पराभव होणारा उमेदवार ३४/ते ३५ हा  दरम्यानच्या आसपास असू शकतो.अकोले तालुक्यात गायकर गटातील माञ ५/८मतदान फुटल्याची चर्चा सध्या सुरु आहे.विजय कोणाचा हे माञ आम्ही कोणाची ही एकतर्फी बातमी करणार नाही नाव हे कोणाचे ही घोषित करणार नाही.का...