अकोले-गायकरांना भाजप प्रवेशाचे डोहाळे?वाचा बरच काही विश्लेषण...

अहिल्यानगर जिल्हात जिल्हा बँकेचा निकाल बाहेर पडला अनेकांचा यात पराभव झाला तर खासदार लंके यांनी आपला गड राखल्याचे चिञ सध्या समोर येत आहे.माञ आता जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी सुजय विखे पाटिल यांचे नाव सध्या चर्चेत आहे.तरी माजी मंञी बाळासाहेब थोरात म्हणतील तोच चेअरमन होईल अशी चर्चा अहिल्यानगर मध्ये सुरु आहे,राजकिय बलाबल पाहता हे चिञ सष्ट होत आहे.थोरात आपल्या विश्वासू व्यक्तीला अध्यक्ष पदी बसवणार की उपाध्यक्ष पदी हे पाहणे आता अहिल्यानगर जिल्हात चर्चेचा विषय बनले आहे.सहाकरातील निवडणुक म्हणून राजकीय मतभेद बाजुला ठेऊन अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणुक पार पडली आहे माञ आता अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर दावा कोण करणार आणी यासाठी लाॅबिग होण्याची शक्यता नाकारली जात नाही.
---------------
त्यातच अकोले तालुक्यात पिचड, भांगरे,गायकर हे एकञ आल्याने अकोलेत आता हे सगळे किती दिवस सोबत राहणार आणि आमदार किरण लहामटे यांना कसा शह अडिज वर्षात देणार हे पाहावे लागणार आहे की सहकाराची निवडणुक म्हणुन गायकर आपल्या पक्षाच्या आमदारासोबत पुन्हा सलगी करणार आणि आमदार किरण लहामटे हे गायकर यांना मनापासुन स्वीकारणार का हे आगामी काळ ठरवणार आहे.अगस्ती कारखाना वाचवण्यासाठी आपण जिल्हा बँकेत जाणे गरजेचे होते असे मत काल सिताराम पाटिल गायकर व्यक्त केले,हे वास्तव माञ अकोले तालुक्यातील जनतेला कारखाना अडचणीत असताना नाकारून चालणार नाही माञ त्याच कारखान्यावर आमदार लहामटे व गायकर यांची सत्ता दिसुन येते यामुळे आमदार लहामटे हे  अगस्ती कारखान्यातील चुकीच्या गोष्टी या बाहेर आणतील अशी छुपी चर्चा तालुक्यात सुरु आहे.भांगरे, पिचड,गायकर व तालुक्यातील अनेक गाव पुढारी यांच्या विरोधात येऊन सहाकारातुन आमदार लहामटे यांना हद्दपार करण्याचा विडा पाहता भविष्यात गायकर यांना भाजप प्रवेशाचे डोहाळे लागल्याच अनेक राजकीय अभ्यासकांचे मत आहे.राष्ट्रवादी अजित पवार पक्षात वरिष्ठ पातळीवर समन्वय नसल्याच चिञ आहे.काल परवाच्या बातमी नुसार जेष्ट नेत्यांना डावलत पार्थ पवार हे निर्णय घेत असल्याची चर्चा सुरू आहे तर दादा गेल्यानंतर पक्षात गायकर यांचे राजकिय वजन कमी झाले असुन कारखाना व संस्था चालवण्यासाठी भाजप मंञ्याचीच मदत होत असुन येत्या आगामी काळात गायकर हे भाजप प्रवेशद्वार करतील असा आमचा अंदाज आहे.शिवाय भाजप सोबत गेल्यास पिचड यांना ताकद मिळेल आणि दुसरीकडे संस्था चालवण्यासाठी सरकार व. मंञी लोकांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते.कदाचित हा प्रवेश जिल्हा परीषद पंचायत समितीच्या तोंडावर होईल की भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे निश्चितपणे सांगता येणार नाही.माञ भाजप प्रवेश होणे काल झालेल्या निवडणुक निकालाचे पातक असणार का?हे आगामी काळात पहायला मिळणार आहे.
------------
काल आमदार लहामटे यांचा पराभव झाला एकुण ३६मते ही आमदार किरण लहामटे यांना पडली तर संजीवनी शिंदे यांना ४९मते मिळाली शिंदे यांचा विजय झाला आहे.१३मतांनी आमदार लहामटे यांचा पराभव झाला आहे.सहकारातील कोणत्याही दांडगा राजकीय अभ्यास नसताना ही खुल्या जागेवर आमदार लहामटे यांनी तत्कालीन निर्णय घेत ही निवडणूक लढविण्याचा निर्णायक घेतला.त्यात सगळे विरोधक व पक्षातील जेष्ठ नेते एका बाजूला गेल्याने आमदार लहामटे हे एकाकी पडले त्यातच आदिवासी व मराठा हा फेक निरेटिव सेट केल्याने या निवडणुकीचा रंग वाढवला होता.माञ सगळे एकञ येऊन ही आमदार लहामटे यांना १२ मते कमी पडली पडली यामुळे आमदार लहामटे हे खुल्या जागेवर उमेदवारी करताना त्यांनी भरपुर मते घेतली व सगळे सोबती व विरोधक यांना त्यांनी धावपळ करायला लावली याचीच चर्चा सध्या सुरु आहे,दुसरीकडे सहकारातील दांडागा अनुभव असणारे सहकारमहर्षी म्हणुन ओळखले जाणारे गायकर हे दहा वर्ष संचालक व काही वर्ष संचालक, राहिले,दुसरे वैभवराव पिचड ही जिल्हा बँकेत राहिले,तिसरे अमित भांगरे ही जिल्हा बँकेत संचालक राहिले आहेत.सहाकारातील दांडगा अनुभव, रणनिती याच्या अनुभवाचा तिघांनी पाहिजे हवा तितका फायदा झाला नाही.जर हा फायदा, रणनिती आखली असती तर आमदार किरण लहामटे १७ मताच्या पुढे जाऊ शकले नसते.
-----------------
अकोले तालुक्यात सध्या कोण,कोणा सोबत हे कळण्याला मार्ग नाही
-----
अकोले तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमक, कोण,कोणासोबत हे कळायला मार्ग नव्हता.शरद पवार पक्षाचे तालुका प्रमुख सुरेश गडाख व विकास शेटे हे आमदार किरण लहामटे बरोबर दिसुन आले तर ज्या माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मुळे विधानसभेला अवघ्या पाच हजार मताने पराभूत झालेले अमित भांगरे हे माजी आमदार पिचड व गायकर यांच्या सोबत राहिले व शिवाय पञकार परीषद घेत जाहीर पाठिंबा ही जाहीर केला.ज्यांच्यामुळे पराभवाचा सामना करायला लागला त्यांचेच बँनर युवानेते अमित भांगरे सध्या लावत असल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.यामुळे पक्षात तालुका प्रमुख व कार्यकर्ते एकीकडे आणि नेता वेगळीकडे असे चिञ दिसुन आले आहे.
----------------
भांगरे, पिचड,गायकर एकञ येऊन जर जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणूका आमदार लहामटेंच्या विरोधात लढणार असतील तर माञ नक्कीच आमदार किरण लहामटे यांना मोठा तोटा होउ शकतो.माञ राजकारणात कोणी, कोणाचा फार काळ मिञ नसतो,शञु ही नसतो त्यामुळे भविष्यात गायकर हे स्व. अजितदादा पवार यांच्या पक्षाला ताकद देणार की आपल्याच नेत्याच्या पक्षाला सुरुंग लावणार हे आगामी काळात दिसणार आहे.
-------------

Comments

Popular posts from this blog

अकोले-"नाव मोठ लक्षण खोट"नावाने गाजलेल्या पतसंस्थाचा कारभार खोटा

अकोले-जिल्हा बँकेसाठी संमिश्र ठराव...कोणाचे पारडे ठरणार जड

अकोले-लोखंडे-पिचड, लहामटे -शिंदे लढत, शेटेंची माघार