Posts

Showing posts from August, 2026

अहिल्यानगर कुंभार समाज जिल्हा उपाध्यक्षपदी नगरसेवक हितेश कुंभार यांची एकमताने निवड

Image
  अकोले तालुका कुंभार समाजाची बैठक संत गोरोबाकाका मंदिर कुंभार वाडा अकोले येथे पार पडली.सदर बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्हाचे कुंभार समाज संघटना चे अध्यक्ष श्री राजाभाऊ बोरुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाजाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली समाजाचे अनेक प्रलंबित समस्या व मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी अकोले तालुक्यात सक्षम पदाधिकारी निवड गरजेची आहे असा सूर सर्व समाजबांधवांकडून उमटला अध्यक्ष साहेबांनी तालुक्यातून आलेल्या सर्व बांधवांचे मनोगत प्रतिक्रिया ऐकून घेतल्या व नूतन पदाधिकारी यांची कार्यकारिणी जाहिर केली.सदर कार्यकारिणी मध्ये अकोले नगरपंचायत चे  विद्यमान नगरसेवक  श्री हितेश रामकृष्ण कुंभार यांना जिल्हा कार्यकारणी वर घेत जिल्हा उपाध्यक्ष हे पद घोषणा केली.अकोले तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल नानासाहेब भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष पदी श्री राजेंद्र बाळासाहेब उकिर्डे (तालुका संपर्क प्रमुख अतिरिक्त ), उपाध्यक्ष मनोज शंकर भालेराव, उपाध्यक्ष सर्जेराव कचरू जोंधळे, कार्याध्यक्ष संजय पंढरीनाथ भालेराव, सचिव पदी श्र...

अकोले-कॅप व जिवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न

Image
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाकी जिल्हा परीषद शाळा व प्राजक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कॅप तथा सहयोग उपक्रम व जीवदया प्रातिष्ठाण निंब्रळ यांच्या संयुक्त सहभागातुन काल शालेय विद्यार्थी यांना शालेय उपयोगी वह्या,पुस्तके,पेन्सिल, पेन,रेनकोट हे साहित्य इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन दोन्ही ही संघटना सामाजिक कार्यात सक्रिय असुन दुर्गम,डोंगराळ भागातील शालेय शिक्षण घेणा-या गरजुवंत विद्यार्थी यांच्यासाठी सामाजिक उपक्रम राबवत आहेत.तसेच जीवदया प्रातिष्ठाण  निंब्रळ यांच्याकडुन अनेक वर्षापासुन वृक्षसंवर्धनाचे कार्य गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन अविरतपणे सुरु आहे.विविध गावात जाऊन वृक्षारोपण करणे व वृक्षसंवर्धन व वृक्षरोपणाची चळवळ उभी करत समाज्यात वृक्षाबद्दल जागरूकता व जनजागृती करण्याचे काम जीवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन सुरु आहे. जीवदया प्रातिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे.काल निंब्रळ येथे स्मशानभूमी परीसर सुशोभित व्हावा या...