अहिल्यानगर कुंभार समाज जिल्हा उपाध्यक्षपदी नगरसेवक हितेश कुंभार यांची एकमताने निवड

 
अकोले तालुका कुंभार समाजाची बैठक संत गोरोबाकाका मंदिर कुंभार वाडा अकोले येथे पार पडली.सदर बैठकीसाठी अहिल्यानगर जिल्हाचे कुंभार समाज संघटना चे अध्यक्ष श्री राजाभाऊ बोरुडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाजाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली समाजाचे अनेक प्रलंबित समस्या व मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी अकोले तालुक्यात सक्षम पदाधिकारी निवड गरजेची आहे असा सूर सर्व समाजबांधवांकडून उमटला अध्यक्ष साहेबांनी तालुक्यातून आलेल्या सर्व बांधवांचे मनोगत प्रतिक्रिया ऐकून घेतल्या व नूतन पदाधिकारी यांची कार्यकारिणी जाहिर केली.सदर कार्यकारिणी मध्ये अकोले नगरपंचायत चे  विद्यमान नगरसेवक  श्री हितेश रामकृष्ण कुंभार यांना जिल्हा कार्यकारणी वर घेत जिल्हा उपाध्यक्ष हे पद घोषणा केली.अकोले तालुका अध्यक्ष पदी श्री राहुल नानासाहेब भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली.संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष पदी श्री राजेंद्र बाळासाहेब उकिर्डे (तालुका संपर्क प्रमुख अतिरिक्त ), उपाध्यक्ष मनोज शंकर भालेराव, उपाध्यक्ष सर्जेराव कचरू जोंधळे, कार्याध्यक्ष संजय पंढरीनाथ भालेराव, सचिव पदी श्री नितीन रमेश भालेराव, सह सचिव श्री  सागर भाऊसाहेब चव्हाण, खजिनदार पदी श्री नवनाथ रामनाथ भालेराव या सर्वांची निवड एक मतांनी सर्व समाजबांधवानी सुचविल्या प्रमाणे जिल्हाध्यक्ष यांनी केली.कार्यकारिणी सदस्य श्री बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, श्री अरुण नामदेव कदम,श्री गोरक्ष मारुती मोरे, श्री गणेश रंगनाथ वाकचौरे, श्री कचरू हरिभाऊ भालेराव, श्री मारुती विठोबा भालेराव, श्री नानासाहेब मोहनराव कोते, श्री कैलास दामोदर भालेराव, श्री गोरख उकिर्डे आदी. ची निवड देखील मान्यवर यांनी केली.सदर बैठकी साठी जिल्ह्याचे मान्यवर पदाधिकारी श्री भाऊसाहेब आवंडकर, श्री शिवाजी कोंडीराम महाशिकारे तसेच श्री पांडुरंग सांळूंके, व विलास सैंदोरे आदी मान्यवर सदर बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Comments