Posts

Showing posts from October, 2026

अकोले-जातिवादापेक्षा राजकारण खिलाडूवृत्तीने करा

Image
अकोले तालुक्यात सध्या जिल्हा बँकेचे वारे वाहत आहे.अकोले तालुका हा पुरोगामी, डाव्या,उजव्या आणि विद्रोही चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो,जातीय अन्याय,अत्याचार सहन केला जात नाही.अश्या तालुक्याला सध्या जातीयवादाचा मोठा शाप लागल्याच चिञ समोर येत आहे.याचे आणखी निमित्त झाले ते म्हणजे सध्या दिवाळीच्या धामाधुमीत जिल्हा बँकेची निवडणुक होय...अकोले तालुक्यात आज पर्यंत जातीय समिकरणांची बेरीज ही राजकीय, सामाजिक समतोल राखण्याचे काम इथल्या प्रस्थापित राजकिय मंडळी यांनी केल आहे.जिल्हा बँकेच्या राजकारणात बहुजन नेते सिताराम पाटिल गायकर यांच्या कन्या संजिविनी गायकर,शिंदे या सोसायटी मतदार संघाच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या माञ अनेक दिग्गजांनी गायकर यांचे उतारवयाचा व आजारपणामुळे आदर करत आपले अर्ज माघारी घेतले तर त्यांच्याच जवळच्या मंडळींनी "आण्णा" ठिक होते पण त्यांची 'कन्या" संजिविनी नको असे म्हणत खाजगीत नाराजी व्यक्त करत होते.माञ राज्यघटनेला अपेक्षित,संविधानाला अभिप्रेत व सार्वभौमत्व टिकवणारी निवडणूक ही संजीवनी यांनी का लढवु नये असा एक सुर मोठ्या प्रमाणात अक...

अकोले-सूत्र ठाण्यातून हालली निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन अखेर बंद करण्याच्या सूचना

Image
अकोले तालुक्यातील पाणी प्रश्नावर ब-याच दिवसांपासुन संघर्षाची परस्थिती निर्माण झाली.पाणी बंद करावे म्हणुन शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी समोर येत असताना तसेच आदिवासी ठाकर समाज्यातील एका युवकाचा पाण्यात बुडुन मुर्त्यु झाला होता.अकोले तालुक्यातील युवानेते मारुती मेंगाळ यांनी अधिकारी वर्गाला पाणी बंद करावे अशी विनंती वजा सुचना माञ पाणी बंद होत नसल्याने शेतकरी बांधव व ठाकर समाज्याच्यावतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज अखेर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री मारुती मेंगाळ साहेब यांच्या विनंतीला मान देत पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया सो.यांच्या सूचनेनुसार अखेर निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन तातडीने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी सुगाव परिसरात प्रवरा नदीपात्रात दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता  देवठाण येथील एका युवकाची बॉडी  मिळून येत नसल्याचे श्री मारुती मेंगाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज अखेर आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सदर आदेशाची जिल्हाअ...

अकोले-लोखंडे-पिचड, लहामटे -शिंदे लढत, शेटेंची माघार

Image
अकोले तालुक्यातील जिल्हा बँकेत नामवंत मंडळींनी माघार घेतल्या असुन अकोले तालुक्यातुन कोण,कोण माघार घेणार याची उत्सुकता सर्वांना लागुन राहिली होती.युवानेते विकासराव शेटे यांच्या भूमिकेकडे विशेषतः सर्वांचे लक्ष लागुन राहिले होते कारण आमदार लहामटे,माजी आमदार पिचड यांची अप्रत्यक्षपणे दिलजमाई करण्याचा प्रयन्न वरिष्ठ पातळीवर सुरु होते.यामुळे विकासराव शेटे यांनी आपण माघार घेणार नसल्याच गेल्या अनेक दिवसांपासुन घोषित केले होते,या संदर्भात त्यांचे सोशल मिडियाच्या न्युज पोर्टलच्या माध्यमातुन व्यक्तीगत मत ही प्रसिद्ध झाले होते अखेर शेटे यांनी आज माघार घेतली असुन "बाप आला तरी माघार घेणार नाही,ऎकणार नाही अशी वल्गना करणाऱ्या युवानेते विकास शेटे हे अखेर माघार घेऊन शांत झाले आहेत न्युज सह्याद्री एक्सप्रेस या अगोदर वार्तांकनाचे विश्लेषण करताना सांगितले गायकर आणि विकास शेटे हे एकमेकांचे स्नेही असुन विकास शेटे हे माघार घेणारच यांची अनेक कारणे  न्युज सह्याद्री एक्सप्रेसने सष्ट केले होते.गायकर कुटुंबाला सेफ वातावरण करण्यासाठी हा खेळलेला डाव होता याबाबत माध्यमात मध्ये चर्चा सुरु होती.एका पोर्...

अकोले-"नाव मोठ लक्षण खोट"नावाने गाजलेल्या पतसंस्थाचा कारभार खोटा

Image
अकोले-महाराष्ट्रात सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पतसंथा, बँका, मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्या यांनी वसुली साठी जाऊ नये तथा तगादा लावु अन्यथा त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाअधिकारी यांच्याकडे  गुन्हे व तक्रार दाखल करण्यात येतील अशी सुचनाच महाराष्ट्र सरकार यांच्याकडुन देण्यात आली असताना ही अकोले तालुक्यातील नामंवत समजल्या जाणाऱ्या "जनाची" सेवा करणाऱ्या "लक्ष्मी" असलेल्या पतसंस्थेकडुन शेतकरी वर्गाच्या घरी जात वसुलीचा तगादा सुरु केला आहे.शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत अनेक पतसंस्था या सध्या आपलाच अधिकार व रोख सामान्य शेतकरी वर्गावर रोखत आहे.कमान दुष्काळाच्या सावटाखाली महाराष्ट्र असताना अनेक महाराष्ट्रातील पतसंस्था या शेतकरी वर्गाच्या मदतीसाठी पाऊल उचलत असताना अकोलेतील ठराविक पतसंस्था या शेतकरी वर्गाचे जाणीवपूर्वक शोषण करत असल्याचा प्रकार समोर येत आहे म्हणजे या काही ठराविक पतसंस्था या शासनाच्या कायद्याला न जुमानता फक्त वसुली साठी लक्ष करत आहेत अलिकडच्या काळात याच पतसंस्थेतुन ओरीजनल सोने हे "बनावट" सोने म्हणुन देण्याचा प्र...

जिल्हा बँकेच्या राजकारणात खासदार निलेश लंके,राम शिंदे आमदार किरण लहामटे,आमदार अमोल खताळ यांना एकटे पाडण्याचा घाट...

Image
सध्या जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे संपुर्ण अहिल्यानगर जिल्हा हा दुष्काळ जाणवत असताना आणि देशाची आर्थिक परस्थिती डबघाईला जात असताना माञ जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे गजबजुन गेला आहे.पालकमंञी विखे पाटिल, माजी मंञी थोरात एकञ येत सहकारातील राजकारणातुन नवा अध्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सध्या दिसुन येत आहे माञ खरच जिल्हा बँक वाचवण्यासाठी ही धडपड आहे की राजकारणातुन सहकार जपण्याचा प्रयन्न की आपला भविष्यातील पिढ्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा हा प्रयन्न दिसुन येत आहे.महाराष्ट्रात वसंतराव नाईक,यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर अहिल्यानगर मध्ये जिल्हाचे राजकारणात अनेक नामवंत लोकांनी जसे की पदमश्री विठ्ठलराव विखे,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात,कोपरगावातील काळे कोल्हे, भाऊसाहेब हांडे,माजी मंञी मधुकरराव पिचड यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.मुळ सहकाराचा पाया आखताना शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता व सहकारातुन सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना आधार, कारखानदारीतुन शेतकरी बांधवाचा विकास साधणे अर्थात शेतकरी वर्ग सधन करणे हा होता माञ नंतरच्या पिढीत राजकीय प्रस्थापित मंडळींनी फक्त आपल...