जिल्हा बँकेच्या राजकारणात खासदार निलेश लंके,राम शिंदे आमदार किरण लहामटे,आमदार अमोल खताळ यांना एकटे पाडण्याचा घाट...
सध्या जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे संपुर्ण अहिल्यानगर जिल्हा हा दुष्काळ जाणवत असताना आणि देशाची आर्थिक परस्थिती डबघाईला जात असताना माञ जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे गजबजुन गेला आहे.पालकमंञी विखे पाटिल, माजी मंञी थोरात एकञ येत सहकारातील राजकारणातुन नवा अध्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सध्या दिसुन येत आहे माञ खरच जिल्हा बँक वाचवण्यासाठी ही धडपड आहे की राजकारणातुन सहकार जपण्याचा प्रयन्न की आपला भविष्यातील पिढ्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा हा प्रयन्न दिसुन येत आहे.महाराष्ट्रात वसंतराव नाईक,यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर अहिल्यानगर मध्ये जिल्हाचे राजकारणात अनेक नामवंत लोकांनी जसे की पदमश्री विठ्ठलराव विखे,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात,कोपरगावातील काळे कोल्हे, भाऊसाहेब हांडे,माजी मंञी मधुकरराव पिचड यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.मुळ सहकाराचा पाया आखताना शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता व सहकारातुन सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना आधार, कारखानदारीतुन शेतकरी बांधवाचा विकास साधणे अर्थात शेतकरी वर्ग सधन करणे हा होता माञ नंतरच्या पिढीत राजकीय प्रस्थापित मंडळींनी फक्त आपली कारखानदारी वाढण्यासाठी व राजकीय वजन वाढवण्यासाठी सहकार या गोंडस नावाचा वापर केला आहे कारण आज मितीस जिल्हा बँकेवर एकुण कर्ज हे साडेचार हजार कोटीच्या आसपास असुन सत्ताविशे ते अठ्ठाविशे हजार कोटी कर्ज हे फक्त सहकाराच्या नावाखाली कारखानदारी करण्यासाठी वापरले गेले आहे.मग आता हे कारखानदार कोण तर अहिल्यानगर जिल्हातील आजी-माजी आमदार यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या पॅनलची सत्ता प्रत्येक कारखान्यात आहे.अर्थातच हे सगळेच जण हे प्रस्थापित राजकीय लोक आहेत यामुळे या लोकांनीच जिल्हा बँक बुडवण्याचे पाप केले आहे.जर जिल्हा बँक टिकवण्याचा हा जर प्रमाणिक प्रयन्न या मंडळींचाही असता तर जिल्हा बँकेचे सत्ताविशे ते अठ्ठाविशे कोटी कर्ज आजमितीस थकवले गेले नसते
------------------
विखे-थोरात एकञ का ?,राजकिय वारसा टिकण्यासाठी की,थकलेले कर्ज टिकवण्यासाठी एकञ?
ऎकमेकांचे कट्टर वैरी म्हणुन कायम अनेक दशकात समोर असणारे पालकमंञी विखे व माजी मंञी थोरात यांचे राजकिय शञू असणारे एकञ येऊन त्यांनी अहिल्यानगरच्या राजकारणाला चेकमेट दिली परंतु ही आपली कारखानदारी व आपला भविष्यातील पिढीचा राजकीय वारसा टिकवण्यासाठी केली आहे हे खर वास्तव असल्याची अशी जोरदार चर्चा अहिल्यानगर मध्ये आहे.हे सगळ करत असताना जिल्हा बँक टिकली पाहिजे ता गोंडस नावाखाली सगळे अर्थात ज्यांनी कारखान्याच्या म्हणजेच सहकार,शेतकरी टिकवण्याच्या नावाखाली फक्त कर्ज उचलुन आपलेच नाव कारखाना उत्तम आपण चालवु शकतो अशी एक धारणा सामान्य शेतकरी वर्गात तयार केली जर तुम्ही कारखाना व्यवस्थित चालवू शकत असाल तर कारखान्यावर असणारे जिल्हा बँकेचे कर्ज का थकवता? अर्थात सोसायट्यांच्या वतीने शेतकरी वर्गाने उचलले कर्ज हे मोठ्या प्रमाणात वसुल आहे,त्या गोरगरीब शेतकरी वर्गाने परत केले आहे परंतु कारखानदारांनी का भरले नाही,हा मोठा सवाल आहे?...
-------------
या सगळ्या राजकारणात नवनिर्वाचित असणारे आमदार खासदार यांना एकटे पाडण्याचा प्रयन्न झाला आहे,यामध्ये खासदार निलेश लंके, विधानसभेचे भाजपचे राम शिंदे, आमदार किरण लहामटे,आमदार अमोल खताळ यांना याचा फटका असणार आहे विशेष म्हणजे खासदार लंके वगळता सगळे महायुतीत आहेत.म्हणजे आमचा प्रस्थापित म्हणून टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एकञ येऊ शकतो तुम्हाला फक्त आमचे प्यादे आहात हे जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे पुढे आले आहे.अहिल्यानगर मधिल प्रत्येक तालुक्यात आपलेच नाव सहकार आणि राजकारण यात अमर राहावे यासाठी एकञ येऊन जिवंत ठेवण्याचा हा प्रयन्न प्रस्थापित राजकारणी करत आहे.माञ इतिहास हा सगळ बोलतो,सांगत असतो,यामुळे कार्यकर्ता म्हणुन समर्थक म्हणून कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय कमावतात आहात व काय गमावत आहात याचा विचार हा सबंध शेतकरी यांनी जिल्हा बँकेच्या संदर्भात केला पाहिजे का करावा याचे वास्तव हे मी खालील लेखात नमुद करणार आहे,सहकारी संस्था या व्यवस्थित व पारदर्शी कारभाराने टिकल्या तरच सहकार टिकेल नाहीतर सहकारातून समृध्दीकडे माञ समृध्दी कडुन लोक सहकाराकडे जात असल्याच चिञ अहिल्यानगर नव्हे तर संपुर्ण राज्यात दिसुन येत आहे,आणि सहकारातुन समृध्दीकडे,विना सहकार नाही उध्दार हे वाक्य आता हे वाक्य एखाद्या जेष्ठ नेते,स्वर्गीय नेते यांच्या पुस्तकातच वाचण्यासाठी यो्य राहिल
----—-----—-
ठरावासाठी आर्थिक घोडेबाजार
संपूर्ण अहिल्यानगर जिल्हात सध्या जिल्हा बँकेच्या ठरावाच्या राजकारणासाठी मोठा आर्थिक घोडेबाजार सुरु आहे.काही ठराव झालेले लोक हे सहलीसाठी रवाना झाले आहे ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या संस्थाचे ठराव झालेले लोक हे अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामिण भागातीलच आहेत माञ आपण ज्यांचा ठराव केला ते ठरावावाले लोक हे आपल्या आर्थिक व्यवहाराचा लिलाव लावुन जर जगत असतील तर तुम्ही सहकारातून खरच शेतकरी वर्गाला सधनतेकडे,प्रगतीकडे एक विचारशील शेतकरी म्हणुन आहात का?याचा विचार करण्याची गरज आहे
--—--------
उद्याच्या भागात राजकिय वारस,मानसपुञ,शब्द,योगदान
----—---
Comments
Post a Comment