अकोले-जिल्हा बँकेसाठी संमिश्र ठराव...कोणाचे पारडे ठरणार जड
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ठरावांची अकोले तालुक्यात मोठी रंगत वाढली असून अकोले तालुक्यात सद्यस्थितीत प्रत्येक गटाकडे संमिश्र ठराव झाल्यावर चिञ आहे.आमदार किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड,बहुजन नेते सिताराम पाटील गायकर, युवानेते अमित भांगरे या सर्वांनी ताकद लावुन आपल्या आपल्या हक्काच्या कार्यकर्ते यांचे ठराव गावपातळी वरील कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन केले आहेत त्यामुळे अकोले तालुक्यात नेमक तालुक्यात एकुण झालेल्या ठरावात कोणाचे पारडे जड हे सांगता येणार नाही याच गोष्टीमुळे अकोले तालुक्यातील ठराव झालेल्या व्यक्तींचे महत्व ही वाढणार आहे म्हणजेच घोडेबाजाराला वाव मिळणार आहे.काही गावातील बहुमताने ठराव झाले तर काही गावात नाराजीचा सुर पहायला मिळाला आहे.काही गावात तर राजकारणाची जिल्हास्तरीय ओळख नसणाऱ्या सभासदांचा ठराव करण्यात आला आहे माञ हा ठराव करताना तो "आपलच ऎकणार म्हणुन त्याचा ठराव केला"अशी खाजगीत चर्चा तालुक्यात आपलीच पाठ आपण थोपटण्याचा प्रकार दिसून येत आहे.माञ गावपातळीवरील राजकारणाचा फायदा हा नेहमीच नेत्यांना होत असतो अर्थात गावपातळी वरील छोट्या,मोठ्या कार्यकर्ते यांना ताकद दिल्यानंतरच भविष्यात ही ताकद जिल्हा बँक,जिल्हा परीषद, पंचायत समिती येथे कामास येते आणि त्या नेत्यांकडे मतदान झुकत असते."कामापुरता मामा"अशी वागणुक नेत्यांकडुन दिली गेल्यानंतर व आपल्या नेत्याचे रंग ओळखले गेल्यानंतर कार्यकर्ते हे काही दिवसांनी नेत्याच्या पक्षात राहतात माञ त्यांना मतदान करत नाही.मुळा,प्रवरा,आढळा,राजुर विभागात ही ठराव संमिश्र आहेत.विशेषतः राजुर पट्यात आजी,माजी आमदार व भांगरे कुटुंब यांच्या संपर्कातील कार्यकर्ते यांचे संमिश्र ठराव दिसुन येतात तर प्रवरा पट्यात आजी आमदार यांचे कमी ठराव दिसुन येतात बोटावर मोजण्या इतपतच ठराव हे आमदार यांना प्रवरा विभागात ठराव मिळाले आहेत.यामुळे प्रवरा विभाग हा जरी आजी माजी आमदार यांच्या सोबत विधानसभा निवडणुकीत असला तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तो गायकरांच्या सोबत आहे यामुळेच प्रवरा पट्यात अपवादानेच आमदार लहामटे गटाचे ठराव दिसुन येत आहेत यामुळे प्रवरा विभागात गायकर गटाचाच ठरावांमध्ये वरचष्मा दिसुन येत आहे.तर मुळा विभागात डाॅ.किरण लहामटे व सिताराम पाटिल गायकर यांच्यात ठराव करण्याची स्पर्धा दिसुन आली.या गटात आपल्या गटाकडे जास्तीत-जास्त ठराव व्हावेत म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष शरदराव चौधरी यांनी कंबर कसली होती.पिचड,भांगरे गटाला अपवादानेच काही ठराव मिळाले आहेत,मुळा विभागात माञ लहामटे व गायकर अशीच स्पर्धा दिसुन येत आहे.आढळा विभागात आमदार लहामटे,माजी आमदार पिचड यांच्या गटाची ठरावाचीच चर्चा दिसुन येते माञ प्रत्यक्षात काय होणार हे निवडणुक झाल्यानंतर समजु शकते.गाव पातळीवरील अनेक पक्षिय विरोधक मंडळी असली तरी माञ आजमितीस जिल्हा बँकेच्या राजकारणात ती मंडळी ही पक्षीय भेद बाजूला ठेऊन उलट्या दिशेने जाताना दिसत आहेत माञ जिल्हा बँकेच्या राजकारणात माञ पक्ष, सत्ताधारी असा विचार कुठे ही लोकल राजकारण व गावपातळीवरील जमवलेले कार्यकर्ते हेच आत्मा आहेत हे नव्याने सष्ट झाल आहे.

Comments
Post a Comment