अकोले-लोखंडे-पिचड, लहामटे -शिंदे लढत, शेटेंची माघार

अकोले तालुक्यातील जिल्हा बँकेत नामवंत मंडळींनी माघार घेतल्या असुन अकोले तालुक्यातुन कोण,कोण माघार घेणार याची उत्सुकता सर्वांना लागुन राहिली होती.युवानेते विकासराव शेटे यांच्या भूमिकेकडे विशेषतः सर्वांचे लक्ष लागुन राहिले होते कारण आमदार लहामटे,माजी आमदार पिचड यांची अप्रत्यक्षपणे दिलजमाई करण्याचा प्रयन्न वरिष्ठ पातळीवर सुरु होते.यामुळे विकासराव शेटे यांनी आपण माघार घेणार नसल्याच गेल्या अनेक दिवसांपासुन घोषित केले होते,या संदर्भात त्यांचे सोशल मिडियाच्या न्युज पोर्टलच्या माध्यमातुन व्यक्तीगत मत ही प्रसिद्ध झाले होते अखेर शेटे यांनी आज माघार घेतली असुन "बाप आला तरी माघार घेणार नाही,ऎकणार नाही अशी वल्गना करणाऱ्या युवानेते विकास शेटे हे अखेर माघार घेऊन शांत झाले आहेत न्युज सह्याद्री एक्सप्रेस या अगोदर वार्तांकनाचे विश्लेषण करताना सांगितले गायकर आणि विकास शेटे हे एकमेकांचे स्नेही असुन विकास शेटे हे माघार घेणारच यांची अनेक कारणे  न्युज सह्याद्री एक्सप्रेसने सष्ट केले होते.गायकर कुटुंबाला सेफ वातावरण करण्यासाठी हा खेळलेला डाव होता याबाबत माध्यमात मध्ये चर्चा सुरु होती.एका पोर्टलच्या माध्यमातुन आपली भुमिका सष्ट करताना विकासराव शेटे यांनी बाप आला तरी माघार नाही हा आपला श्बद जनतेला उद्देशून आश्वासित करताना दिला होता.आता आमदार किरण लहामटे, संजिविनी गायकर शिंदे,माजी आमदार वैभवराव पिचड,खासदार लोखंडे यांचे चिरंजिव प्रशांत लोखंडे  यांच्यात आता जिल्हा बँकेत सरळ,सरळ  लढाई होणार आहे.माञ आमदार किरण लहामटे यांनी अनुसूचित जमातीतुन अर्ज माघारी घेतल्याने ते खुल्या सोसायटी मतदार संघातून निवडणुक लढणार असल्याच चिञ सष्ट झाल आहे.माघारी मध्ये शरद पवार गटाचे अमित भांगरे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख शरद चौधरी,जेष्ठ नेते मधुकराव नवले,बाळासाहेब भोर,वाकचौरे कैलासराव,गंगाराम धुमाळ,रामदास आंबरे संदिप शेणकर,विकासराव शेटे यांनी माघार घेतली आहे.यामुळे आमदार किरण लहामटे यांनी अनुसूचीत जमाती गटातुन माघार घेतल्यामुळे माजी आमदार वैभवराव पिचड यांचा जिल्हा बँकेसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला    असल्याच चिञ सष्ट होत असतानाच प्रशांत लोखंडे लढण्याचा निर्णय घेतल्याच कळत आहे.तर तालुका प्रमुख शरदराव चौधरी,विकासराव शेटे व इतरांनी माघार घेतल्यामुळे संजीवनीगायकर-शिंदे यांचा जिल्हा बँकेत प्रवेश जवळ,जवळ निश्चित झाला आमदार किरण लहामटे यांनी सोसायटी मतदार संघातून लढण्याचा निर्णय घेतला आता ही निवडणुक अटी,तटीची होणार की गमतीची याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यामुळे राजकारण हे सामान्य माणसासाठी नसत याचा विचार करून सामान्य कार्यकर्ते यांनी एकमेकांची डोकी फोडी नयेत नाहीतर तुमचे नेते एक होतात आणि तुम्ही गावपातळी वर वैर पत्कारुन कायमचे वाईट होता.

Comments

Popular posts from this blog

अकोले-"नाव मोठ लक्षण खोट"नावाने गाजलेल्या पतसंस्थाचा कारभार खोटा

अकोले-जिल्हा बँकेसाठी संमिश्र ठराव...कोणाचे पारडे ठरणार जड

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..