Posts

Showing posts from July, 2026

*अखेर सोनालीताई नाईकवाडी अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान*

Image
अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी अखेर सोनालीताई नाईकवाडी यांची निवड झाली असुन उपनगराध्यक्षपदी यांची निवड झाली असुन गेल्या सहा ते सात महिन्यापासून हे राजकीय सत्ता नाट्याचा आज शेवट झाल्याच पहायला मिळाल आहे सोनाली नाईकवाडी ११मते पडली तर विरोधी गटाला अवघी सहा मते पडल्याने एक मताचा गोंधळ दिसुन आला आहे सोनालीताई नाईकवाडी यांच्याकडे बारा मतांचा गट असताना एक मत कोणाचे फुटले अशी चर्चा सुरु खाली आहे..रीस्क नको म्हणुन सातजणांचा गट हा काही दिवस पर्यटनाला गेल्याच दिसुन आल होत.वादविवाद व तणावस्थिती लक्षात घेऊन प्रसाशनाकडुन तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड समर्थक मोठ्या संख्यने जमा झाले होते.भारतीय जनता पार्टीचा विजय असो,वैभवभाऊ तुम आगे बढो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.माजी आमदार पिचड यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने आपल्या नगरसेवकांना सुचना केल्या होत्या कि तुम्ही भाजपाच्या तिकिटावर उमेदवार केली असुन तुम्ही वैष्णवी धुमाळ यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे अवाहन केले होते.ज्यांचा प्रचार करत आमदार वैभवराव पिचड यांनी केला मते मागितली तेच...

अकोले-लढाई अस्तित्वाची,राजकिय प्रतिष्ठेची...,कोण होणार नगराध्यक्ष?

Image
कोण होणार अकोले नगरपंचायतचा नगराध्यक्ष ? याचा फैसला आज होणार असुन भाजपचाच नगराध्यक्ष होणार अशी चर्चा सध्या अकोले शहरात सुरू असुन भाजपाच्या सोनालीताई नाईकवाडी या नगराध्यक्ष होतील असा कयास लावला जात आहे ही निवडणुक सोनाली नाईकवाडी यांच्या साठी राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते तर माजी आमदार पिचड यांच्या राजकीय यांच्या कारकिर्दीला सुरुंग लावणारी म्हणजेच राजकीय अस्तित्वाची मानली जात आहे. उपनगराध्यक्ष पदी नवनाथ शेटे यांची वर्णी लागणार असल्याच समजत आहे.माञ या सगळ्या राजकीय रणधुमाळीत भाजप पक्षाची अंतर्गत असलेली धुसफुस ,गटबाजी यामुळे राजकीय अकोलेत लपून राहिलेली नाही.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपात दोन गट दिसुन आले होते एक गट खुल्या पणाने आमदार लहामटे यांच्या सोबत होता.आज भाजप पक्षाचे नेतृत्व हे माजी आमदार वैभवराव पिचड करत असुन भाजप पक्षातच नगरपंचायत मध्ये दोन गट पडले आहेत.अनेक दिवसांपासुन हे नाराजीनाट्य सुरू असताना सक्षम पक्ष व नेतृत्व समजले जाणारे यांच्या कडे आपल्याच भाजप पक्षातील नगरसेवक यांनी वारंवार नगराध्यक्ष यांचा राजिनामा घ्या व दुस-या व्यक्तीला संधी द्या अशी मागणी होत असताना ही ...

अकोले-अकोल्यात वैभव पिचड यांची भाजप आणि काँग्रेस ची युती? बाळासाहेब थोरात यांचे समर्थक नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

Image
अकोले तालुक्यात सध्या नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर अकोले नगरपंचायत नगराध्यपदावर गंडातर आले आहे,अनेक दिवसांपासुन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आपआपल्या वार्डातच निधी वाटप केल्याचा आरोप अनेक दिवसांपासुन नगरसेवक करत होते याबाबत सत्तेत असणारे (भाजप)नगरसेवक हेच विरोधात असल्याच समोर आले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे नगरसेवक सुद्धा बाळासाहेब वडजे यांच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात आहेत माञ काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक प्रदिप नाईकवाडी हे काँग्रेस पक्षाचे असुन ही भाजप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या भुमिकेबरोबर राहिल्याचे चिञ अकोले शहरात लपून राहिलेले नाही,माञ देशात आणि राज्यात भाजपचा विरोधी पक्ष म्हणूनच असलेल्या काँग्रेस पक्षाची भुमिका ही नगरसेवक प्रदिप नाईकवाडी यांनी आज पर्यंत पाळलेली दिसत नाही. सोनाली नाईकवाडी,प्रतिभा मनकर,हितेश कुंभार,कविता शेळके,माधुरी शंकर,जनाबाई मोहिते,सागर चौधरी,तमन्ना शेख तर भाजपाच्या दुसर्या गटात वैष्णवी धुमाळ,बाळासाहेब वडजे,श...
Image
अकोले तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वे मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पर्यवेक्षक डॉ. सय्यद साहेब आणि खडके साहेब यांच्या देखरेखीखाली आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी अकोले नगरपंचायत हद्दीतील घरोघरी भेट देऊन कंटेनर सर्वे केला. यावेळी घर परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी साठणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया प्रतिबंधासाठी नागरिकांना आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळणे, पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे व ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ...

अकोले_दरडग्रस्त कुटुंबाला मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेकडून मदतीचा हात

Image
, दि. 26 जुलै : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरे येथील श्री.हरी शांताराम उघडे यांच्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचे घर व संसारोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात बाधित झाले. या घटनेची माहिती मिळताच मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेचे सदस्य शंकर लांडे यांनी तातडीने अंथरूण-पांघरूण देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.त्यानंतर 60 सदस्य असलेल्या मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोले यांनी सामाजिक दायित्व जपत ग्रुपच्या एकत्रित निधीतून ₹5,000 किमतीचा किराणा व ₹5,000 किमतीची घरगुती भांडी, अशी एकूण ₹10,000 ची अत्यावश्यक मदत करण्याचा निर्णय घेतला. रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी ग्रुपचे सदस्य डॉ. विष्णू बुळे व सौ. बुळे मॅडम, श्री. राजुशेठ पुंड व सौ. सुशीला पुंड, शंकर लांडे साहेब तसेच बुधाजी पेढेकर सर यांनी पांजरे येथे जाऊन हरी शांताराम उघडे यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेच्या सर्व सदस्यांच्या वतीने किराणा व घरगुती भांड्यांचे मदत ...

अकोलै_पांजरे येथे भूस्खलनग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत

Image
अतिवृष्टीमुळे पांजरे येथील गडदुआई परिसरात श्री. हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तसेच घरातील आठ शेळ्याही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते श्री. भाऊ उघडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच आमदार साहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते त्वरित घटनास्थळी दाखल झालत्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री. शंकर लांडे व त्यांचे सहकारी, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार व त्यांची टीम, घाटघर येथील ग्रामविकास अधिकारी श्री. सोमनाथ गभाले, तसेच स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून बचावकार्य राबविण्यात आले. या मदतकार्याद्वारे श्री. हरी शांताराम उघडे यांच्यासह आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. संबंधित यंत्रणांनी तत्परतेने मदतकार्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

अकोले_९आॅगस्ट आदिवासी दिनासाठी पक्ष ,पार्टी सोडुन एकञ या-दिपक पथवे

Image
अकोले-९आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या पूर्वतयारीसाठी आज अकोले विश्रामगृह येथे आदिवासी समाज्याची आज बैठक पार पडली.यावेळी कार्यक्रामची रूपरेषा व आदिवासी समाज,संस्कृती जपली जावी तसेच आदिवासी महापुरूषांच्या विचाराचे जतन व संवर्धन केले जावे,प्रत्येक घरावर आदिवासी समाज्याचे प्रतिक असलेला झेंडा लावला जावा, तसेच आदिवासी दिनाची पाविञ्यता राखली जावी,पक्ष,पार्टी,संघटना,गट,तट याचा विचार न करता आदिवासी समाज्याचा एक स्वाभिमानाचा व अस्मिता असलेला दिवस म्हणून साजरा करावा असे अवाहन सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिपक पथवे यांनी केले आहे.यावेळी, सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ पथवे, तालुका अध्यक्ष तुळशिराम कातोरे, युवाध्यक्ष विलासराव अगिवले,राजू सावंत, अशोक रावते,सरपंच एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर मेंगाळ,दौलत पथवे,लताबाई मेंगाळ,रोहिणी गावंडे,लहु मेंगाळ,राया ठाकर संघटनेचे अध्यक्ष अक्षय उघडे व पदाधिकारी व अकोले तालुक्यातील राजुर,आढळा,प्रवरा,मुळा व पठार विभागातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते हे उपस्थित होते.

प्रसिद्ध अभिनेते व वृक्षदूत सयाजी शिंदे २४ जुलै रोजी इंदोरी गावात! 🌿

Image
अकोले तालुक्यातील इंदोरी या गावात प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २४जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. एस.एन.एफ,चळवळीच्या सोशल नेटवर्कींग फोरम वतीने नाशिक जिल्हातील ३६ गावात हे वाचानालये यशस्वीपणे चालु असुन अहिल्यानगर जिल्हात पहिल्यांदाच अकोले तालुक्यातील इंदोरी या गावात हे वाचनालयाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते,निसर्गमिञ तथा वृक्षदुत सयाजी शिंदे,साहित्यिक तथा लेखक रंगनाथ पठारे सर,प्रकाशिका सुमतीताई लांडे,हैदराबाद येथुन मधु शेरी,आमेरीका येथुन योगेश कासट,पुणे येथुन योगेश्वर डागा, एस.एन.एफ.चे संस्थापक प्रमोद गायकवाड पदश्री पुरस्कार विजेत्या, बिजमाता राहिबाई पोपेरे उपस्थित राहणार आहे. अकोले तालुक्यातील इंदोरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित रहावे असे अवाहन ग्रामपंचायत, जिल्हा परीषद,प्रवरा विद्यालय, श्री क्षेञ विठ्ठल देवस्थान,आपल शिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोलेत युरीया खताचा तुटवडा, शेतकरी हैराण

Image
अकोले तालुक्यात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत असुन शेतकरी वर्गाला युरिया खतासाठी रांगा लावुन उभे राहावे लागत असल्याची परस्थिती दिसुन येत आहे.अकोले तालुक्यात आदिवासी बांधव हे राजुर,कोतुळ,पांजरे,घाटघर,केळी सांगवी,पाचपट्टा,पेढेवाढी तिन ही विभागात सध्या भातपिकांची लागवड सुरु झाली आहे तर काही ठिकाणी भात पिकांची लागवड झाली आहे माञ त्या पिकासाठी असलेला पुरेसा साठा हा विक्रेता यांच्याकडे उपल्बध नाही.तसेच प्रवरा,मुळा,आढळा विभागातील शेतकरी यांनी पावसाळी  पिक म्हणून सायोबिन,बाजरी हे पिके केली आहेत तर बागायतदार शेतकरी यांनी प्लाॅवर,कोबी,वालवड,आदि फळभाज्या,पालेभाज्या पिके शेतात आहेत माञ आजमितीस शेतकरी वर्गासाठी युरिया खत मिळणे म्हणजे पैसे देऊन स्वतः चे हाल करुन घेणे अशी परस्थिती आली आहे.सबंधित प्रसाशन हे हंगामपुर्व आढावा घेत असते माञ हा आंदाजे लागवड क्षेञ व प्रत्यक्ष लागवड क्षेञ याचे खरच परीक्षण करते का? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. सबंधित विभाग का कायमच्या सारखा सुस्त असुन पावसाळ्यात शेतकरी वर्गाला खते उपल्बध करुन देण्याची जबाबदारी असताना जाणीवपूर्वक सबंधित विभाग ह...

अकोले_लाडक्या बहिणीनंतर आता ‘लाडका पत्रकार’ योजना सुरू करा; अकोला अधिवेशनातून राज्य सरकारकडे एकमुखी मागणी!

Image
अकोला, प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज अकोला (विदर्भ) येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी पत्रकारांच्या हितासाठी दहा महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले असून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पत्रकारांच्या विविध समस्या, संरक्षण, कल्याणकारी योजना आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.अधिवेशनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे "लाडकी बहीण" योजनेप्रमाणे राज्यातील पत्रकारांसाठी "लाडका पत्रकार योजना" सुरू करण्यात यावी, या मागणीचा. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी हा महत्त्वपूर्ण ठराव सभागृहात मांडला. पत्रकारांचे सामाजिक योगदान, लोकशाही बळकट करण्यात असलेली त्यांची भूमिका, तसेच अत्यंत कठीण परिस्थितीतही जनतेसाठी सातत्याने काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाने स्वतंत्र कल्याणकारी योजना लागू कराव...

अहिल्यानगर_जिल्हा बँक पालकमंञी विखे व सभापती शिंदे सत्तासंघर्ष

Image
अहिल्यानगर जिल्हा आणि राजकारण म्हटल की ठराविक नावांच्यामुळे अहिल्यानगरचे राजकारण ओळखण्याची परंपरा आहे यात पिचड,विखे,थोरात,काळे,कोल्हे,मुरकुटे,तनपुरे,घुले,ही नावे म्हणजे अहिल्यानगर जिल्हात आणि महाराष्ट्रात प्रचलित नावे आहेत.या प्रत्येक घराण्याने आपला राजकीय वारसा जसा जमेल तसा पुढे नेण्याचा प्रयन्न आजची पिढी करत आहे.यातील काही आडनावांना नव्या बदलत्या राजकिय समिकरणांनी अव्हान देत सत्ता पालट हि केला परंतु ही नावे राजकीय पटलांवरुन पूर्णतः कधी म्हणजेच आज पर्यंत पुसली गेली नाही.उदाहरणादाखल बोलायच झाल तर पिचड घराण्याचा पराभव हा लहामटे यांनी केला तर माजी खासदार सुजयदादा विखे यांचा पराभव हा खासदार लंके यांनी केला.तर काळे व कोल्हे यांचा पराभव व राजकीय संघर्ष कालानुरुप राहिला तर संगमनेर तालुक्यात जेष्ठ नेते थोरातांचा पराभव आमदार अमोल खताळ यांनी केला आहे.माञ या सगळ्या राजकीय मंडळीची सुरवात ही काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीतुन झाली हे कोणी ही नाकारू शकत नाही.या सर्व घराण्यांचा मागील कालखंडातील राजकय इतिहास बघता इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वैचारीक प्रभावाखाली ही घराणी आजमितीस प्रस्थापित झाली ...

अकोले -जिल्हा बँकेत चालणार का?विखे पाटलांचा हुकमी पत्ता?

Image
अकोले तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या राजकारणावर खाजगीत अनेक राजकीय कार्यकर्ते यांच्या अभ्यासपुर्ण चर्चा दिसुन येत असुन या चर्चेमध्ये काय होणार?कसे होईल,कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण पोटाच्या गाठीशी असणार याची मोठी रंगतदार चर्चा घडत आहे जिल्हा बँकेसाठी अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय डावपेच सुरु आहे.सगळे महायुतीतच आहेत पण कोण,कोणाचा आहे हे समजायला मार्ग नाही आपल्या राजकीय कारकीर्दीचा वापर करत,ग्रामिण, शहरी भागातील आपल्या वजनाचा वापर करत नेते मंडळींनी आप,आपल्या बाकीचे ठराव केले असले तरी राजकीय डावपेचांची टांगती तलवार भावी उमेदवारांच्या असणार आहे.हे गणित समजुन घ्यायचे असेल तर सगळ्यांना राजकीय स्थिती समजुन घ्यावी लागणार आहे.एक महायुतीत आमदार किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटिल गायकर,माजी जिल्हा परीषद सदस्या सुनिताताई भांगरे,व शिंदे गट हे सर्व जण एकाच सत्ताधारी म्हणजेच महायुती पक्षात आहे म्हणजे जिल्हा बँकेत आपले उमेदवार सहजच बहुमताने विजयी करतील अशी स्थिती आहे कारण ९०%ठराव हे यांच्याच संपर्कातील आहे माञ आजची अकोले तालुक्यातील राजकीय ...

अकोले-जिल्हा बँकेसाठी संमिश्र ठराव...कोणाचे पारडे ठरणार जड

Image
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या ठरावांची अकोले तालुक्यात मोठी रंगत वाढली असून अकोले तालुक्यात सद्यस्थितीत प्रत्येक गटाकडे संमिश्र ठराव झाल्यावर चिञ आहे.आमदार किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड,बहुजन नेते सिताराम पाटील गायकर, युवानेते अमित भांगरे या सर्वांनी ताकद लावुन आपल्या आपल्या हक्काच्या कार्यकर्ते यांचे ठराव गावपातळी वरील कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करुन केले आहेत त्यामुळे अकोले तालुक्यात नेमक तालुक्यात एकुण झालेल्या ठरावात कोणाचे पारडे जड हे सांगता येणार नाही याच गोष्टीमुळे अकोले तालुक्यातील ठराव झालेल्या व्यक्तींचे महत्व ही वाढणार आहे म्हणजेच घोडेबाजाराला वाव मिळणार आहे.काही गावातील बहुमताने ठराव झाले तर काही गावात नाराजीचा सुर पहायला मिळाला आहे.काही गावात तर राजकारणाची जिल्हास्तरीय ओळख नसणाऱ्या सभासदांचा ठराव करण्यात आला आहे माञ हा ठराव करताना तो "आपलच ऎकणार म्हणुन त्याचा ठराव केला"अशी खाजगीत चर्चा तालुक्यात आपलीच पाठ आपण थोपटण्याचा प्रकार दिसून येत आहे.माञ गावपातळीवरील राजकारणाचा फायदा हा नेहमीच नेत्यांना होत असतो अर्थात गावपातळी वरील छोट्या,मोठ्या कार्यकर्ते ...

अकोले-जिल्हा बँकेच्या ठरावासाठी आर्थिक घोडेबाजार,ग्रामिण भागातील ठरावावर भावी उमेदवारांचे लक्ष