अकोले-जिल्हा बँकेच्या ठरावासाठी आर्थिक घोडेबाजार,ग्रामिण भागातील ठरावावर भावी उमेदवारांचे लक्ष

अकोले तालुक्यात सध्या अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणुक पुढील महिन्यात होउ घातली असुन जिल्हा बँकेच्या ठरावासाठी अकोले तालुक्यातील गावा-गावातील विकास कार्यकारी सोसायट्यांमध्ये ठरावाची प्रक्रिया सुरू झाली असुन मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार सुरु झाला आहे.बाजूने व आपल्याला मतदान करील अश्या कार्यकर्त्याचा ठराव करण्यासाठी सोसायटीच्या संचालक यांना ठराविक रक्कमा देऊन ठराविक व्यक्तीचाच ठराव व्हावा यासाठी गावा,गावातील काही गटाकडुन,काही गटाचे लोक हे उमेदवारांकडुन अप्रत्यक्षपणे रक्कमा घेत गावातील ठराव आम्ही करुन घेतो अशी वल्गना करत असल्याचे समोर आले आहे,तर काही काही गावातील पुढाऱ्यांना हाताशी धरत इच्छुक उमेदवारांकडुन तुम्ही जबाबदारी घ्या, ठराव करुन द्या अशी गळ घातली आहे तर काही गावातील गावपुढारी समजणाऱ्या तर नेत्यांनी ठराव घेण्याची जबाबदारी आमची म्हणत आर्थिक देवाण-घेवाण केल्याच चिञ अप्रत्यक्षपणे समोर येत आहे.माञ सगळ्या गोष्टीं समोर येत असताना काही रक्कमा या ठराविक पतसंस्थेतुन दिल्या गेल्याच समोर येत आहे यामुळे जिल्हा बँक निवडणुक ही जरी पुढील महिन्यात होत असली तरी त्याची रंगीत तालिम आता पासूनच सुरु असल्याच चिञ अकोले तालुक्यात दिसुन येत आहे.माञ या सर्व जिल्हा बँकेच्या इच्छुकांमध्ये कोणताही सामान्य घरातील चेहरा  निवडणुकीमध्ये उतरताना दिसत नसून सर्व इच्छुक हे एक तर राखिव जागेसाठी आजी,माजी आमदार हे असू शकतात तर ओपन जागेसाठी एक भावी उमेदवार हा माजी चेअरमन यांच्या घरातील भावी पिढीतील असण्याची शक्यता आहे,तर प्रवरा पट्यातील एक युवानेता "मला आण्णांनी श्बद दिला आहे ,त्यामुळे इच्छुक आहे म्हणत सध्या गाव पुढारी मंडळी यांच्या भेटीगाठी घेत आहे" माञ जनरल जागे साठी दोन्ही इच्छुक माजी संचालक व भावी संचालक एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे व एकाच ताटात जेवणारे असल्यामुळे हा काही राजकीय अभ्यासकांना राजकीय डावपेच वाटत आहे.तर काही राजकीय अभ्यासकांच्या मते पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार असल्याने आताच आपल्याला उमेदवारीचा श्बद द्यावा यासाठी जाणीवपूर्वक जिल्हा बँकेची उमेदवारी करण्याचा अर्थात अडवणुक करण्याचा प्रयन्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.माञ ठरावाच्या मतदानासाठी पुरवल्या जाणाऱ्या आर्थिक घोडेबाजार लक्षात घेता निवडणुका या लोकशाही पद्धतीने व्हाव्यात ही गोष्ट भाषणापुरती मर्यादित राहिली आहे.अनेक गावात विकास सोसायटीच्या मिटिंगा या वादविवाद यांच्यामुळे व काही कारणास्तव विरोधक यांच्या आक्रमक पाविञ्यामुळे पुढे ढकलल्या आहेत
-------------
अहिल्यानगर जिल्हा बँकेचे राजकारण हे आर्थिक गणितांवर व राजकीय सबंधावरच अवलंबुन असल्याच मागील काळात दिसुन आल आहे.मागील काळात चेअरमन निवडीच्या मतदान प्रक्रियेत ही स्व.आदर्श उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांना ही आपल्या जवळच्याच लोकांनी दगा दिल्यावर समोर आल होत अर्थात त्यातुन दादांचा मोठा रोष त्यावेळी महाविकास आघाडीत असणाऱा जिल्हा बँकेत संचालक म्हणुन गेलेल्या युवानेता व एका जेष्ट नेत्यावर होता.मागील निवडणुकीत शेतकरी नेते दशरथ सांवत यांनी अर्ज भरत निवडणुकीत रंगत आणली आणि ऎनवेळी शेवटच्या क्षणी गायकर यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली होती.यावेळी निवडणुकीत तसाच काही प्रकार जाणीवपूर्वक होणार का?अशी शंका अनेकांना आहे.सध्या लहामटे, भांगरे,पिचड, मेंगाळ(भाजप+राष्ट्रवादी अजित पवार गट+शिंदे गट) हे सगळे सत्तेत आहेत त्यामुळे निवडणुक बहुमतासाठी सोपी असली तरी राखिव जागा कोणाला,गटाला पक्षाला ,ओपन जागा कोणा पक्षाला गटाला?जागा दोन उमेदवार इच्छुक अनेक यामुळे हा तोडगा आंतिम वरीष्ठ पातळीवर मिटवला जाऊ शकतो.यावरुन नाराजीचा सुर उमटू शकतो .तसेच स्वतः अकोलेचे आमदार डाॅ.किरण लहामटे हे सत्ते सोबत आहेत त्यामुळे अकोले तालुक्यात महायुती कशी जिल्हा बँकेचे राजकारण करणार व भावी उमेदवार या एकाच सत्तेत असलेल्या पण गट,तट,,विसंवाद असणाऱ्या मंडळीना एकञ करत ठरावासाठी मतांचा एकञित गठ्ठा मतदानासाठि कसा करणार हे पाहाव लागेल.जिल्हा बँकेच्या मागील निवडणुकीत स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी जास्तीचे ठराव करत आपल्या मुलाच्या रुपाने महाविकास आघाडीला एक युवा संचालक दिला होता यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड,आमदार डाॅ.किरण लहामटे,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शरदराव चौधरी,,अमित भांगरे ,कैलासराव वाकचौरे,बहुजन नेते सिताराम पाटील गायकर,युवानेते विकास कचरु शेटे हे सध्या तरी जिल्हा बँकेसाठी इच्छुक असल्याच दिसुन येत आहे.अहिल्यानगर जिल्हातील राजकीय परस्थिती पाहता जिल्हा बँकेत महायुतीचा झेंडा असणार या बद्दल अनेकांन शंका नाही माञ अकोले तालुक्यातुन कोण जिल्हा बँकेत संचालक म्हणुन जाणार तसेच एकाच सत्तेत असलेले गट कसे ऎकमेकांच्या विरोधात उतरणार कां?की एक जिवाने एकमेकांवर आरोप करणार हे पाहावयास लागणार आहे..संपादक-भाऊसाहेब साळवे

Comments