अकोले तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या साथरोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वे मोहीम राबविण्यात येत आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका पर्यवेक्षक डॉ. सय्यद साहेब आणि खडके साहेब यांच्या देखरेखीखाली आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी अकोले नगरपंचायत हद्दीतील घरोघरी भेट देऊन कंटेनर सर्वे केला.यावेळी घर परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या व इतर पाणी साठणाऱ्या वस्तूंची तपासणी करण्यात आली. डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया प्रतिबंधासाठी नागरिकांना आठवड्यातून एक दिवस "ड्राय डे" पाळणे, पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आवश्यक खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे व ताप किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामकांत शेटे साहेब यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Popular Posts
लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment