अकोले -जिल्हा बँकेत चालणार का?विखे पाटलांचा हुकमी पत्ता?
अकोले तालुक्यात सध्या जिल्हा बँकेच्या राजकारणावर खाजगीत अनेक राजकीय कार्यकर्ते यांच्या अभ्यासपुर्ण चर्चा दिसुन येत असुन या चर्चेमध्ये काय होणार?कसे होईल,कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण पोटाच्या गाठीशी असणार याची मोठी रंगतदार चर्चा घडत आहे जिल्हा बँकेसाठी अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात राजकीय डावपेच सुरु आहे.सगळे महायुतीतच आहेत पण कोण,कोणाचा आहे हे समजायला मार्ग नाही आपल्या राजकीय कारकीर्दीचा वापर करत,ग्रामिण, शहरी भागातील आपल्या वजनाचा वापर करत नेते मंडळींनी आप,आपल्या बाकीचे ठराव केले असले तरी राजकीय डावपेचांची टांगती तलवार भावी उमेदवारांच्या असणार आहे.हे गणित समजुन घ्यायचे असेल तर सगळ्यांना राजकीय स्थिती समजुन घ्यावी लागणार आहे.एक महायुतीत आमदार किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटिल गायकर,माजी जिल्हा परीषद सदस्या सुनिताताई भांगरे,व शिंदे गट हे सर्व जण एकाच सत्ताधारी म्हणजेच महायुती पक्षात आहे म्हणजे जिल्हा बँकेत आपले उमेदवार सहजच बहुमताने विजयी करतील अशी स्थिती आहे कारण ९०%ठराव हे यांच्याच संपर्कातील आहे माञ आजची अकोले तालुक्यातील राजकीय स्थिती, राजकीय वैर,भविष्यातील राजकारण याचा विचार करता आमदार लहामटे व माजी आमदार पिचड एकाच महायुतीत असले तरी ते एकमेकांना कट्टर विरोधकच समजुन काम करत आहेत तर आमदार लहामटे आणि गायकर हे एकाच स्व.अजितदादा पवार यांच्या पक्षात काम करत आहेत म्हणजे आमदार आणि गायकर एकञच आहे अस म्हणायला हरकत नाही माञ हे दोघे एकञ आल्या नंतर माजी आमदार पिचड हे महायुती पक्ष म्हणुन जुळवुन घेणार का?कारण अगस्ती कारखाना निवडणुकीत गायकरांनी ८५वर्षाचा माणुस नेतृत्व करु शकतो का? अस म्हणतो आदिवासी हदयसम्राट स्व.वंदनिय पिचड साहेबांवर टीका केली होती.शिवाय आमदार किरण लहामटे यांच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भुमिका ही गायकर यांनी बजावली आहे. हे एकी बाजुचे चिञ असले तरी दुसर्या बाजूने पाहिले तर अलिकडच्या एक,दोन वर्षाच्या काळात पिचड-भांगरे हे आपले जुने वैर विसरुन नव्या पिढीत एकञित येऊन सामाजिक राजकारणाचा आमदार लहामटेंच्या विरोधात नवा पांयडा पाडत आहेत म्हणजे राजकीय सख्ख जवळीकीचे कारण असु शकतात.मग बहुजन नेते हे पिचड व गायकर यांच्या जवळ जर जिल्हा बँकेच्या ठरावांसाठी जवळ गेले तर आमदार लहामटे यांची मते त्यांना मिळणार का?आणि जर गायकर हे आमदार लहामटे यांच्या सोबत जिल्हा बँकेच्या मतदान,ठराव यासाठी राहिले तर पिचड-भांगरे हे गायकर यांना स्वीकारणार का?हा खरा जिल्हा बँकेच्या साठी अकोले तालुक्यात पेच असणार आहेत त्यातच राखिव जागेतून लहामटे,पिचड,भांगरे तीन घराण्यातील उमेदवार इच्छूक आहेत तर खुल्या जागेसाठी बहुजन नेते गायकर स्वतः किंवा त्यांच्या कन्या या इच्छुक आहेत,तसेच माजी जिल्हा परीषद सदस्य कैलासराव वाकचौरे, विकासराव शेटे, अकोले अजितदादा पवार पक्ष तालुका अध्यक्ष शरद चौधरी हे इच्छुक आहेत.यामुळे एकमेकांचे भविष्यातील राजकारण संपवण्याच्या नादात नामवंत उमेदवारांचा ही पराभव होऊ शकतो.माञ या सगळ्या गोष्टींमध्ये महाविकास आघाडीची कुठे ही चर्चा अथवा कोण उमेदवार असणार, महाविकास आघाडीचे नेते अमित भांगरे किंवा तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांच्या पक्षाचा कुठला ही उमेदवार सष्टपणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण उमेदवार घेऊन उतरणार हे दिसत नाही यामुळे महाविकास आघाडी पक्षात संभ्रम दिसत आहे.याचे प्रमुख कारण पक्षा पेक्षा राजकारणापेक्षा व्यक्तीगत असलेले स्व.अशोकराव भांगरे यांचा व विखे घराण्याचा स्नेह,लोभ लक्षात घेता ते विखे पाटिल म्हणतील त्या दिशेने जाताना दिसतील असे अकोले करांचा अंदाज आहे.त्यातच महाविकास आघाडीत राहायचे आणि काम महायुतीचे करायचे या दुटप्पी ओ यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी अलीकडच्या काळात या अकोलेतील युवानेत्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.याचमुळे अकोले यासबंधीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर झाल्याच चिञ .यामुळे माञ लोकल राजकारणाचा भाग म्हणून त्यांचा हा निर्णय ठिक असेल परंतु तालुक्यातील भविष्यातील राजकारणाची त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे त्यामुळे जिल्हा बँकेची उमेदवारी,भावी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीच चेंडु मंञी विखे यांच्या कडे असणार आहे.अर्थात काय जिल्हा बँकेचे राजकारण लहामटे,गायकर, पिचड, भांगरे यांना शांत करण्याचा औषध व इलाज हा विखे यांच्या वाड्यावरच होणार आहे यात कोणतीही शंका नाही.माञ या सगळ्या गोष्टी मध्ये कोणत्यातरी एका राजकीय घराण्याचा भविष्यातील राजकीय ठरला किंवा ठरवला जाणार आहे.
_________
पुढच्या भागात-विस वर्षापासून सत्ता पण घराणेशाहीचा, वारसासाठीचा सत्तेचा मोह सुटेना...

Comments
Post a Comment