अकोलै_पांजरे येथे भूस्खलनग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत
अतिवृष्टीमुळे पांजरे येथील गडदुआई परिसरात श्री. हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठे भूस्खलन झाले. या दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तसेच घरातील आठ शेळ्याही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.घटनेची माहिती स्थानिक कार्यकर्ते श्री. भाऊ उघडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच आमदार साहेबांच्या सूचनेनुसार कार्यकर्ते त्वरित घटनास्थळी दाखल झालत्यानंतर वन विभागाचे अधिकारी श्री. शंकर लांडे व त्यांचे सहकारी, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार व त्यांची टीम, घाटघर येथील ग्रामविकास अधिकारी श्री. सोमनाथ गभाले, तसेच स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून बचावकार्य राबविण्यात आले.या मदतकार्याद्वारे श्री. हरी शांताराम उघडे यांच्यासह आणखी तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. संबंधित यंत्रणांनी तत्परतेने मदतकार्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

Comments
Post a Comment