अहिल्यानगर_जिल्हा बँक पालकमंञी विखे व सभापती शिंदे सत्तासंघर्ष

अहिल्यानगर जिल्हा आणि राजकारण म्हटल की ठराविक नावांच्यामुळे अहिल्यानगरचे राजकारण ओळखण्याची परंपरा आहे यात पिचड,विखे,थोरात,काळे,कोल्हे,मुरकुटे,तनपुरे,घुले,ही नावे म्हणजे अहिल्यानगर जिल्हात आणि महाराष्ट्रात प्रचलित नावे आहेत.या प्रत्येक घराण्याने आपला राजकीय वारसा जसा जमेल तसा पुढे नेण्याचा प्रयन्न आजची पिढी करत आहे.यातील काही आडनावांना नव्या बदलत्या राजकिय समिकरणांनी अव्हान देत सत्ता पालट हि केला परंतु ही नावे राजकीय पटलांवरुन पूर्णतः कधी म्हणजेच आज पर्यंत पुसली गेली नाही.उदाहरणादाखल बोलायच झाल तर पिचड घराण्याचा पराभव हा लहामटे यांनी केला तर माजी खासदार सुजयदादा विखे यांचा पराभव हा खासदार लंके यांनी केला.तर काळे व कोल्हे यांचा पराभव व राजकीय संघर्ष कालानुरुप राहिला तर संगमनेर तालुक्यात जेष्ठ नेते थोरातांचा पराभव आमदार अमोल खताळ यांनी केला आहे.माञ या सगळ्या राजकीय मंडळीची सुरवात ही काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीतुन झाली हे कोणी ही नाकारू शकत नाही.या सर्व घराण्यांचा मागील कालखंडातील राजकय इतिहास बघता इंदिरा काँग्रेस पक्षाच्या वैचारीक प्रभावाखाली ही घराणी आजमितीस प्रस्थापित झाली आहेत.जशी राजकिय समीकरणे बदलत गेली तसे अहिल्यानगर जिल्हातील राजकारण ही बदलत गेले परंतु अपवादानेच फक्त अहिल्यानगर जिल्हात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि बोट धरून आज ही वाटचाल करत आहेत.हेच राजकारण जिल्हा बँक,पंचायत समिती व जिल्हा परीषद यात याचेच प्रतिबिंब आजपर्यंत कायम राहिले होते अर्थात आपला मतदारसंघ सोडुन शेजारच्या मतदार संघात अपवादानेच पाणी या गोष्टीसाठी डोकावले जायचे.माञ वरिष्ठ राजकारणाच्या व लाॅबिंगच्या नादात शेजारच्या मतदारसंघात डोकावून तिथल्या राजकारणाचा पक्षवाढीच्या नावाखाली स्थानिक नेत्यांचे खच्चिकरण करणे म्हणजे गट तयार करणे हा प्रत्येक आमदार व खासदारांचा छंद बनला.यातुन माञ अहिल्यानगर जिल्हाच्या राजकारणाचा बट्याबोळ झाला आज राजकारण हे जिल्हा बँकेत ही सुरु झाले.आजमितीस भाजप पक्षाचे जेष्ठ नेते राम शिंदे यांच्या विधानसभेतील आपल्याच पक्षातील नेत्यांनी पराभवाचे प्रयन्न केल्यामुळे आज शिंदे हे आपल्या पराभवामुळे तथा आपला गट,आपली पक्षातील ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे.यात यश किती येईल हे पुढे भविष्यात पाहावे लागणार आहे.अलिकडेच ते संगमनेर तालुक्यात आले असता वीस वर्षापासुन सहकाराच्या राजकारणात सक्रिय असणारे,वीस वर्षापासुन जिल्हा बँकेचे संचालक आणि तिन वर्ष अध्यक्ष राहिलेल्या,थोरात घराण्याचे कट्टर विश्वासू असणा-या बाजिराव खेमनर यांची भेट घेत बंद दारा आड चर्चा केली आहे.यामुळे आपल्या गटाचा अध्यक्ष बनवण्यासाठी जेष्ठ नेते राम शिंदे हे सज्ज झाले आहेत.संगमनेर मध्ये जिल्हा बँकेत ते कशी राजकीय समीकरणे जुळवणार हे पाहावयास लागणार आहे माञ यामुळे अकोले तालुक्यात ही राम शिंदे हे आपली ताकद वापरत वेगळा राजकिय डावपेच खेळणार का?असा अभ्यासकांचा तर्क आहे.कारण 2025साली राम शिंदे हे विधान परिषदेचे असताना व अहिल्यानगरचे भुमीपुञ असताना त्यांचा फोटो हा वार्षिक अवहालात छापल्या गेला नव्हता या विषयी चर्चा झाल्यानंतर मला जिल्हा बँकेत लक्ष घालावे लागेल असा संदेश त्यावेळी दिला होता.यामुळे खरच जिल्हा बँकेच्या राजकारणात आता राम शिंदेंनी लक्ष केंद्रीत केल्यावर दिसत आहे.सध्या अकोले तालुक्यात सद्य परस्थिती पाहता शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे हे आमदार किरण लहामटे यांच्या बरोबर असुन हे  दोघे ही शिंदे यांच्या जिल्हा बँकेच्या बाबतीत संपर्कात आहेत यामुळे अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे हे आपला स्वतंत्र पॅनल देत निवडणुक लढवु शकतात असा अंदाज राजकीय अभ्यासक करत आहे.माजी आमदार पिचड व भांगरे हे सद्यस्थितीत पालकमंञी विखे यांच्या संपर्कात आहेत.तर आमदार लहामटे हे राम शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे कळत आहे.शिंदे यांना आपल्या पराभवाची सल व पक्ष वरिष्ठांकडे आपली अहिल्यानगर मध्ये असलेली राजकीय प्रतिष्ठा स्पष्ट करायची आहे यामुळे जिल्हा बँकेची निवडणुक ही पुढे कशी रंग घेणार व रंगत कशी येणार हे पाहावयास लागणार आहे माञ पालकमंञी विखे व जेष्ट भाजप नेते राम शिंदे यांच्यात व प्रत्येक तालुक्यात पक्ष गट,तट याचा राजकारणाचा नवा अंक पहायला मिळणार आहे.
संपादक
श्री-भाऊसाहेब एकनाथ साळवे
----------
उपसंपादक
श्री-किशोर पोपट मोहिते
------------------

Comments