प्रसिद्ध अभिनेते व वृक्षदूत सयाजी शिंदे २४ जुलै रोजी इंदोरी गावात! 🌿

अकोले तालुक्यातील इंदोरी या गावात प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांच्या शुभहस्ते या वाचनालयाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक २४जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. एस.एन.एफ,चळवळीच्या सोशल नेटवर्कींग फोरम वतीने नाशिक जिल्हातील ३६ गावात हे वाचानालये यशस्वीपणे चालु असुन अहिल्यानगर जिल्हात पहिल्यांदाच अकोले तालुक्यातील इंदोरी या गावात हे वाचनालयाचा शुभारंभ होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते,निसर्गमिञ तथा वृक्षदुत सयाजी शिंदे,साहित्यिक तथा लेखक रंगनाथ पठारे सर,प्रकाशिका सुमतीताई लांडे,हैदराबाद येथुन मधु शेरी,आमेरीका येथुन योगेश कासट,पुणे येथुन योगेश्वर डागा, एस.एन.एफ.चे संस्थापक प्रमोद गायकवाड पदश्री पुरस्कार विजेत्या, बिजमाता राहिबाई पोपेरे उपस्थित राहणार आहे.अकोले तालुक्यातील इंदोरी व पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित रहावे असे अवाहन ग्रामपंचायत, जिल्हा परीषद,प्रवरा विद्यालय, श्री क्षेञ विठ्ठल देवस्थान,आपल शिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments