अकोले-लढाई अस्तित्वाची,राजकिय प्रतिष्ठेची...,कोण होणार नगराध्यक्ष?

कोण होणार अकोले नगरपंचायतचा नगराध्यक्ष ? याचा फैसला आज होणार असुन भाजपचाच नगराध्यक्ष होणार अशी चर्चा सध्या अकोले शहरात सुरू असुन भाजपाच्या सोनालीताई नाईकवाडी या नगराध्यक्ष होतील असा कयास लावला जात आहे ही निवडणुक सोनाली नाईकवाडी यांच्या साठी राजकीय प्रतिष्ठेची मानली जाते तर माजी आमदार पिचड यांच्या राजकीय यांच्या कारकिर्दीला सुरुंग लावणारी म्हणजेच राजकीय अस्तित्वाची मानली जात आहे. उपनगराध्यक्ष पदी नवनाथ शेटे यांची वर्णी लागणार असल्याच समजत आहे.माञ या सगळ्या राजकीय रणधुमाळीत भाजप पक्षाची अंतर्गत असलेली धुसफुस ,गटबाजी यामुळे राजकीय अकोलेत लपून राहिलेली नाही.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपात दोन गट दिसुन आले होते एक गट खुल्या पणाने आमदार लहामटे यांच्या सोबत होता.आज भाजप पक्षाचे नेतृत्व हे माजी आमदार वैभवराव पिचड करत असुन भाजप पक्षातच नगरपंचायत मध्ये दोन गट पडले आहेत.अनेक दिवसांपासुन हे नाराजीनाट्य सुरू असताना सक्षम पक्ष व नेतृत्व समजले जाणारे यांच्या कडे आपल्याच भाजप पक्षातील नगरसेवक यांनी वारंवार नगराध्यक्ष यांचा राजिनामा घ्या व दुस-या व्यक्तीला संधी द्या अशी मागणी होत असताना ही माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दुर्लक्ष का केले असा सवाल आता चर्चेचा विषय बनला आहे.खाजगीत पक्ष कार्यालयात बैठका होऊन ही या गोष्टींवर तोडगा निघाला नाही आज याच गोष्टींचा परिपाक म्हणूनच अविश्वास ठराव हा नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावर आणला गेला अखेर आज निवडणुकीच्या दरम्यान कोण कोणाला मतदान करणार या पेक्षा हि स्थिती का ओढावली गेली याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असता नगरपंचायत बाबत नेतृत्वाकडे आली आहे.आज ही जरी सत्ता बद्दल झाला असला,होत असला तरी माजी आमदार वैभवराव पिचड यांना भाजप पक्षात नाराज असणाऱ्या नगरसेवकांकडुन नेतृत्व स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे कारण सत्ताकेंद्रे ही राजकीय ताकदीचे केंद्र असते माञ परस्थितीनुसार योग्य कालावधीत,कालखंडानुसार योग्य बदल घडवुन आणला असता तर भाजपात दोन गट पडण्याची शक्यता दुर्मिळ होती.भाजपात आज दोन गट जरी दिसत असले तरी सत्ता ही भाजपाची असणार यात कोणतीही शंका नाही विषय हा फक्त पक्षातील अंतर्गत असणाऱ्या दोन गटातील वादाचा होता.याच दरम्यानच ओबीसी व मराठा जातीय समिकरणांचा राजकीय डावपेच खेळला गेल्याच चिञ ही लपून राहिल नाही माञ भावी  होणारा नगराध्यक्ष यांना कार्यकाल हा काही महिन्यांसाठीचा असणार आहे.या सगळ्या गोष्टी सुरु असताना राष्टवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचे नगरसेवक तसेच उबाठा गटाचे नगरसेवक ही आज भाजपाच्या मोठ्या गटासोबत महायुती नुसार सोबत आहेत.तसेच शिंदे सेनेत प्रवेश करुन नगरसेवक नवनाथ शेटे व विमल मंडलीक हे भाजप पक्षाच्या सोबत आहेत माञ प्रमोदराव मंडलीक हे व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचे स्नेही असुन उद्याच्या मतदानात ते कोणती भुमिका बजावणारा हे उद्याच सष्ट होणार आहेत.तसेच काँग्रेसचे पक्षाचे नगरसेवक प्रदिप नाईकवाडी हे चार वर्ष समाधानी असल्याचे दिसुन आले आहे कारण त्यांनी सगळे नगरसेवक हे विकास कामांची तक्रार करत असताना त्यांनी आज पर्यंत कोणतीही तक्रार केली नाही.यामुळे ते समाधानी असल्याच गृहीत धरल जात आहे अकोले शहरात भविष्यात व येत्या सहा महिन्याच्या कालावधीत मोठ,मोठ्या योजना,विकास कामे येणार आहेत,म्हणेजच मोठा कोट्यावधीच्या योजना येणार आहे त्यातच एक योजना म्हणजे अकोले शहरासाठी शुध्द पाण्याचा पुरवठा करणारी निळवंडे ते अकोले पाईपलाईन, शुद्धीकरण प्रकल्प...ही अकोले शहरात विकास कामे व आगामी काळात येणारा विकास निधी यासाठीचे श्रेय हा खटाटोप असल्याची चर्चा आता अकोले शहरात होत आहे.उद्या कोण उपस्थित राहणार कोण उपस्थित राहणार नाही, कोण तटस्थ भूमिका घेणार हे सष्टपणे लक्षात येणार आहे.सद्यस्थितीत राजकीय तणावाचे वातावरण पाहता स्पर्धेतुन आज होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीला वाद,विवादाचे गालबोट लागण्याची शक्यता ही नाकारली जाऊ शकत नाही यामुळे पोलिस प्रसाशन व सबंधित प्रशासनाने जागरुक राहण्याची गरज आहे.

Comments