अकोले-अकोल्यात वैभव पिचड यांची भाजप आणि काँग्रेस ची युती? बाळासाहेब थोरात यांचे समर्थक नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?
अकोले तालुक्यात सध्या नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर अकोले नगरपंचायत नगराध्यपदावर गंडातर आले आहे,अनेक दिवसांपासुन नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व उपनगराध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आपआपल्या वार्डातच निधी वाटप केल्याचा आरोप अनेक दिवसांपासुन नगरसेवक करत होते याबाबत सत्तेत असणारे (भाजप)नगरसेवक हेच विरोधात असल्याच समोर आले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे नगरसेवक सुद्धा बाळासाहेब वडजे यांच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात आहेत माञ काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक प्रदिप नाईकवाडी हे काँग्रेस पक्षाचे असुन ही भाजप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या भुमिकेबरोबर राहिल्याचे चिञ अकोले शहरात लपून राहिलेले नाही,माञ देशात आणि राज्यात भाजपचा विरोधी पक्ष म्हणूनच असलेल्या काँग्रेस पक्षाची भुमिका ही नगरसेवक प्रदिप नाईकवाडी यांनी आज पर्यंत पाळलेली दिसत नाही.सोनाली नाईकवाडी,प्रतिभा मनकर,हितेश कुंभार,कविता शेळके,माधुरी शंकर,जनाबाई मोहिते,सागर चौधरी,तमन्ना शेख तर भाजपाच्या दुसर्या गटात वैष्णवी धुमाळ,बाळासाहेब वडजे,शरद नवले,शितल वैद्य तर तिसऱ्या गटात श्वेताली रूपवते,आरिफ शेख,नवनाथ शेटे,विमल मंडलिक या आहेत तर तटस्थ म्हणुन काँग्रेसचे प्रदिप नाईकवाडी असणार अस एकंदरीत चिञ सध्या दिसत आहे.
माञ आज सत्ता बदलाच्या कालावधीत ही नगरसेवक प्रदिप नाईकवाडी हे भाजप सोबत आहेत की महाविकास आघाडी सोबत हर सष्ट करत नाहीत.राज्यात भाजप पक्षाच्या प्रत्येक ध्येय,धोरणे या विषयी विरोधी भुमिका घेणारे काँग्रेस पक्षाचे राज्याचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असणारे नगरसेवक प्रदीप नाईकवाडी हे भाजपसोबत तटस्थ राहणार का?यामुळे थोरात साहेब हे एकीकडे राज्यात भाजप विरोधात भूमिका घेतात तर एकीकडे त्यांचे समर्थकच भाजपला पाठिंबा देतात यामुळे थोरात साहेब भाजपमध्ये दाखल होणार का? या चर्चेला पाठबळ मिळत आहे अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप काँग्रेसची युती ही थोरात साहेबांच्या भाजप प्रवेशाची नांदी ठरते की थोरात साहेब आपल्या समर्थक नगरसेवक यांस तटस्थ भूमिका घ्यायला लावतात की भाजपसोबत जाण्यास सांगतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे त्यामुळे या निवडीकडे व थोरात साहेब यांच्या भूमिकेकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-------------
सद्यस्थितीत व दिसणारे बलाबल
ी
सोनाली नाईकवाडी,प्रतिभा मनकर,हितेश कुंभार,कविता शेळके,माधुरी शंकर,सागर चौधरी,तमन्ना शेख,जनाबाई मोहिते तर भाजपाच्या दुसर्या गटात वैष्णवी धुमाळ,बाळासाहेब वडजे,शरद नवले,शितल वैद्य तर तिसऱ्या गटात श्वेताली रूपवते,आरिफ शेख,नवनाथ शेटे,विमल मंडलिक या आहेत तर तटस्थ म्हणुन काँग्रेसचे प्रदिप नाईकवाडी असणार अस एकंदरीत चिञ सध्या दिसत आहे.ही सद्यस्थिती असल्याने कोण,कोणा बरोबर हे सांगणे कठिण आहे
---------------------

Comments
Post a Comment