अकोले_दरडग्रस्त कुटुंबाला मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेकडून मदतीचा हात

, दि. 26 जुलै : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरे येथील श्री.हरी शांताराम उघडे यांच्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचे घर व संसारोपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात बाधित झाले.या घटनेची माहिती मिळताच मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेचे सदस्य शंकर लांडे यांनी तातडीने अंथरूण-पांघरूण देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.त्यानंतर 60 सदस्य असलेल्या मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोले यांनी सामाजिक दायित्व जपत ग्रुपच्या एकत्रित निधीतून ₹5,000 किमतीचा किराणा व ₹5,000 किमतीची घरगुती भांडी, अशी एकूण ₹10,000 ची अत्यावश्यक मदत करण्याचा निर्णय घेतला.रविवार, दि. 26 जुलै 2026 रोजी ग्रुपचे सदस्य डॉ. विष्णू बुळे व सौ. बुळे मॅडम, श्री. राजुशेठ पुंड व सौ. सुशीला पुंड, शंकर लांडे साहेब तसेच बुधाजी पेढेकर सर यांनी पांजरे येथे जाऊन हरी शांताराम उघडे यांच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेच्या सर्व सदस्यांच्या वतीने किराणा व घरगुती भांड्यांचे मदत साहित्य सुपूर्द करण्यात आले.संकटाच्या काळात समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. मॉर्निंग वॉक व सायकल ग्रुप, अकोलेच्या या सामाजिक कार्याचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments