अकोलेत युरीया खताचा तुटवडा, शेतकरी हैराण

अकोले तालुक्यात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत असुन शेतकरी वर्गाला युरिया खतासाठी रांगा लावुन उभे राहावे लागत असल्याची परस्थिती दिसुन येत आहे.अकोले तालुक्यात आदिवासी बांधव हे राजुर,कोतुळ,पांजरे,घाटघर,केळी सांगवी,पाचपट्टा,पेढेवाढी तिन ही विभागात सध्या भातपिकांची लागवड सुरु झाली आहे तर काही ठिकाणी भात पिकांची लागवड झाली आहे माञ त्या पिकासाठी असलेला पुरेसा साठा हा विक्रेता यांच्याकडे उपल्बध नाही.तसेच प्रवरा,मुळा,आढळा विभागातील शेतकरी यांनी पावसाळी  पिक म्हणून सायोबिन,बाजरी हे पिके केली आहेत तर बागायतदार शेतकरी यांनी प्लाॅवर,कोबी,वालवड,आदि फळभाज्या,पालेभाज्या पिके शेतात आहेत माञ आजमितीस शेतकरी वर्गासाठी युरिया खत मिळणे म्हणजे पैसे देऊन स्वतः चे हाल करुन घेणे अशी परस्थिती आली आहे.सबंधित प्रसाशन हे हंगामपुर्व आढावा घेत असते माञ हा आंदाजे लागवड क्षेञ व प्रत्यक्ष लागवड क्षेञ याचे खरच परीक्षण करते का? असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत.सबंधित विभाग का कायमच्या सारखा सुस्त असुन पावसाळ्यात शेतकरी वर्गाला खते उपल्बध करुन देण्याची जबाबदारी असताना जाणीवपूर्वक सबंधित विभाग हा कृषी व्यावसायिक यांच्याशी मिलिभगत करत आहे का? असा सवाल आता शेतकरी वर्गात सुरु आहे.त्यातच अकोले तालुक्यातील दोन कृषी व्यावसायिक यांचे दोन परवाने हे शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत माञ हे कोणते कृषी व्यावसायिक दुकान याची सष्टता अजून सबंधित विभागाने दिली नाही.यामुळे सबंधित विभागाकडे संशयाची सुई जात आहे.माञ स्वतः ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे अनेकजण सध्या गप्प आहेत यामुळे सबंधित विभाग व कृषी अधिकारी यांनी कोणते कृषी व्यावसायिक यांचा परवाना रद्द केला गेला व खते का? शेतकरी वर्गाला युरीया कधी उपल्बध होणार हे सष्ट करणे गरजेचे आहे.तसेच आमदार डाॅ.किरण लहामटे यांनी शेतकरी वर्गासाठी साठेमारी करणाऱ्या व्यावसायिकांवर लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.

Comments