अकोले_९आॅगस्ट आदिवासी दिनासाठी पक्ष ,पार्टी सोडुन एकञ या-दिपक पथवे

अकोले-९आॅगस्ट रोजी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या पूर्वतयारीसाठी आज अकोले विश्रामगृह येथे आदिवासी समाज्याची आज बैठक पार पडली.यावेळी कार्यक्रामची रूपरेषा व आदिवासी समाज,संस्कृती जपली जावी तसेच आदिवासी महापुरूषांच्या विचाराचे जतन व संवर्धन केले जावे,प्रत्येक घरावर आदिवासी समाज्याचे प्रतिक असलेला झेंडा लावला जावा, तसेच आदिवासी दिनाची पाविञ्यता राखली जावी,पक्ष,पार्टी,संघटना,गट,तट याचा विचार न करता आदिवासी समाज्याचा एक स्वाभिमानाचा व अस्मिता असलेला दिवस म्हणून साजरा करावा असे अवाहन सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिपक पथवे यांनी केले आहे.यावेळी, सह्याद्री आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ पथवे, तालुका अध्यक्ष तुळशिराम कातोरे, युवाध्यक्ष विलासराव अगिवले,राजू सावंत, अशोक रावते,सरपंच एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर मेंगाळ,दौलत पथवे,लताबाई मेंगाळ,रोहिणी गावंडे,लहु मेंगाळ,राया ठाकर संघटनेचे अध्यक्ष अक्षय उघडे व पदाधिकारी व अकोले तालुक्यातील राजुर,आढळा,प्रवरा,मुळा व पठार विभागातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते हे उपस्थित होते.

Comments