अकोले-जातिवादापेक्षा राजकारण खिलाडूवृत्तीने करा
अकोले तालुक्यात सध्या जिल्हा बँकेचे वारे वाहत आहे.अकोले तालुका हा पुरोगामी, डाव्या,उजव्या आणि विद्रोही चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो,जातीय अन्याय,अत्याचार सहन केला जात नाही.अश्या तालुक्याला सध्या जातीयवादाचा मोठा शाप लागल्याच चिञ समोर येत आहे.याचे आणखी निमित्त झाले ते म्हणजे सध्या दिवाळीच्या धामाधुमीत जिल्हा बँकेची निवडणुक होय...अकोले तालुक्यात आज पर्यंत जातीय समिकरणांची बेरीज ही राजकीय, सामाजिक समतोल राखण्याचे काम इथल्या प्रस्थापित राजकिय मंडळी यांनी केल आहे.जिल्हा बँकेच्या राजकारणात बहुजन नेते सिताराम पाटिल गायकर यांच्या कन्या संजिविनी गायकर,शिंदे या सोसायटी मतदार संघाच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या माञ अनेक दिग्गजांनी गायकर यांचे उतारवयाचा व आजारपणामुळे आदर करत आपले अर्ज माघारी घेतले तर त्यांच्याच जवळच्या मंडळींनी "आण्णा" ठिक होते पण त्यांची 'कन्या" संजिविनी नको असे म्हणत खाजगीत नाराजी व्यक्त करत होते.माञ राज्यघटनेला अपेक्षित,संविधानाला अभिप्रेत व सार्वभौमत्व टिकवणारी निवडणूक ही संजीवनी यांनी का लढवु नये असा एक सुर मोठ्या प्रमाणात अकोले तालुक्यातुन उमटू लागला आणि याच कारणाने आपल्या वडिलांचा सहकाराचा वारसा,राजकीय काम त्यांचे नाव टिकवुन ठेवणे ही जबाबदारी संजिवनी यांनी खांद्यावर घेतली आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
----------------
काँग्रेसच्या सोनिया गांधी तर आजच्या उपमुख्यमंञी सुनेञा पवार
----—-
महिला या देशात आणि राज्यात कुठे ही कमी पडायला नको म्हणुन केंद्र व राज्य सरकारने अनेक धोरणे राबवली आहेत.महिला या पुरुषांच्या खांद्याला, खांदा लावत उत्कृष्ट राजकारण करत आहे.आपल्या वडिलांनी वेचलेले सहकारासाठी,राजकारणासाठी आयुष्यु ,त्यातुन धकाधकीच्या प्रवासातुन, राञी,अपराञी प्रवासामुळे जागरण त्यामुळे झालेला आजार,तसेच अनेक अकोले तालुक्यातील सरपंच,सोसायटी ,बाजार समिती,दुध संघ,अगस्ती कारखाना अश्या अनेक ठिकाणी बहुजनातील मुलांना नोक-या देणे, अनेक गावपातळी ते राज्य पातळीवर काम करणारे नेते हे गायकर यांचे चाहते आहेत.असा सुस्कंकृत सहाकाराचा व राजकीय वारसा हा थांबवण हे कुठल्या ही राजकीय घराचे लक्षण नसत अगदी या देशाच्या आयटी चे जनक स्वर्गीय राजिव गांधी यांचा वारसा सोनियांजी चालवला,अजितदादाच्या नंतर आदरणिय उपमुख्यमंञी पदी असलेल्या सुनेञाताई चालवत आहेत.यामुळे एक महिला म्हणुन न पाहता एका सक्षम राजकीय,सहकार यांतील बाळकडु ज्या महिलेला मिळाले म्हणून त्यांनी राजकीय व सहकाराचा वारसा होण्याचे काम केल्याचे मत सर्वजण व्यक्त करत आहे.
---—-------------
बहुजन नेते आणि जातीयवादाची बिजे आणि त्याचे अंकुर
-------—------
अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे हे खुल्या सोसायटी मतदार संघात निवडणुक लढवय्या असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली की आमच्या साठी मग काय?माञ हे म्हणविणाऱ्या मंडळींनी त्यांना अधिकार दिलेला नसून भारतीय न्यायव्यवस्थेंने दिलेला आहे त्यामुळे मराठा व इतर जातीत हा वादच मुळी बालिशपणाचे लक्षण समजले जाते,म्हणजे काय तर गायकर यांच्या मुलीने लग्न झाल्यानंतर ही माहेरात निवडणुकीत उभे राहणे भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे तर मग आमदार किरण लहामटे यांना पाकिस्तानातील कायद्याने दिलेला अधिकार आहे का?यामुळे ज्याचे सामर्थ्य ताकदवान असेल तो या निवडणुकीत जिंकेल हे सांगण्याची कोणाला गरज नाही माञ या विषयासाठी अनेकजण फेक निरेटिव्ह पसरवत या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला जातीय रंग देत आहे.दोन्ही उमेदवार हे सामर्थवान आहेत त्यामुळे कोणी जातीवादाचे विष परतत असेल त्यापेक्षा आपल्या उमेदवाराला आपण जिंकून कसे देऊ,काय मदत करु याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
--—-------
एक मुरब्बी राजकारणी तर एकजण सहकारातील पाहुणा
--—-----
आमदार किरण लहामटे हे सहाकाराच्या राजकारणात नविन असुन "आपल्याला सहकारात जास्त काही कळत नाही"असे मिडियात जाहीरपणे अनेकदा सांगितले आहे माञ त्यांच्यासाठी सहकार जाणुन घेण्यासाठी जर या निवडणुकीत उडी मारली असेल तर नवल वाटण्याचे कारण नाही.लहामटे हे जर स्वतः ची ताकद आणि परीक्षा पाहण्यासाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उतरले असतील तर हारजितीचा डाव आहे असे समजुन राजकारण व समाजकारण हे खिलाडूवृत्तीने घेतले पाहिजे कारण नेते जिंकल्यानंतर एकमेकांचे अभिनंदन करतील आणि तुम्ही घेतलेले शञुत्व हे स्वतः साठी घातक असते.तर बहुजन नेते सिताराम गायकर हे सहकारातील मुत्सद्दी व मुरब्ब राजकारणी आहेत.कोणता पत्ता अचुकवेळी कुठे फेकावा,उडणारे वादळ कुठे शांत व किती उंचीवर गेल्यावर करावे याचा अंदाज गायकरांना नेहमीच राहिला आहे.गायकर यांनी आजपर्यंत एखाद्या विषयात हात घातला आणि तो अयशस्वी झाला असे अजुनतरी राजकारणात व सहकाराच्या निवडणुकीत दिसले नाही अगदी स्व.पिचड साहेब,वैभवराव पिचड आणि आमदार किरण लहामटे यांच्या सोबत राहुन ही आपले मुत्सद्दीपणाची व मुरब्बीपणाची जाणिव कायम त्यांनी दाखवली आहे.आणि आमदार किरण लहामटे व बहुजन नेते सिताराम पाटिल गायकर हे भविष्यात एकाच पक्षात मांडीला, मांडी लावुन हितगुज करणार आहेत यामुळे सामान्य कार्यकर्ते यांनी दोघांना ही एक राजकारणी म्हणून पाहत राजकारण खेळासारख्या खिलाडूवृत्तीने घ्यावे.माञ मुलीला येवढा विरोध आपलेच सहकारी करतील अशी अपेक्षा माञ गायकर यांना कधी ही नसेल.आपल्या मुलीला आपल्या सहका-यांकडुन होणारा विरोध गायकरांना जेवढ जिव्हारी लागेल तितकीच निवडणुक रंग घेणार हे बाकी नक्की ...
--—-------
--क्रमश:
Comments
Post a Comment