अकोले-कॅप व जिवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाकी जिल्हा परीषद शाळा व प्राजक्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कॅप तथा सहयोग उपक्रम व जीवदया प्रातिष्ठाण निंब्रळ यांच्या संयुक्त सहभागातुन काल शालेय विद्यार्थी यांना शालेय उपयोगी वह्या,पुस्तके,पेन्सिल, पेन,रेनकोट हे साहित्य इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन दोन्ही ही संघटना सामाजिक कार्यात सक्रिय असुन दुर्गम,डोंगराळ भागातील शालेय शिक्षण घेणा-या गरजुवंत विद्यार्थी यांच्यासाठी सामाजिक उपक्रम राबवत आहेत.तसेच जीवदया प्रातिष्ठाण निंब्रळ यांच्याकडुन अनेक वर्षापासुन वृक्षसंवर्धनाचे कार्य गेल्या पंधरा ते वीस वर्षापासुन अविरतपणे सुरु आहे.विविध गावात जाऊन वृक्षारोपण करणे व वृक्षसंवर्धन व वृक्षरोपणाची चळवळ उभी करत समाज्यात वृक्षाबद्दल जागरूकता व जनजागृती करण्याचे काम जीवदया प्रातिष्ठाण यांच्याकडुन सुरु आहे.जीवदया प्रातिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे.काल निंब्रळ येथे स्मशानभूमी परीसर सुशोभित व्हावा यासाठी वृक्षरोपणाचा उपक्रम पार पडला यावेळी अनेक भविष्यात उपयोगी पडणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.कॅप व जिवदया प्रातिष्ठाण यांच्याबरोबर निंब्रळ येथिल थाळ्याची वाडी येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ही शालेय साहित्य वाटप करण्यात आले.उद्योजक श्री रविंद्र दशरथ आभाळे त्यांच्या सुविद्य पत्नी नयना रविंद्र आभाळे या अनेक दोन्ही ही मंडळी आदिवासी भागातील गरजुवंत विद्यार्थी बांधवासाठी काम करत आहेत.यावेळी कॅप सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. नयना रविंद्रजी आभाळे,अध्यक्ष प्रदिप साठे,सचिव दिनेश भारव्दाज,कोषाध्यक्ष राजेंद्र वझे,संपर्क आधिकारी श्रिकांत दळवी सर व जिवदया प्रातिष्ठाणचे योगेश डावरे,विकी व्यवहारे,विनोद डावरे,ऋषिकेश वडेकर,अक्षय वाकचौरे,करण खोंड आदि लोक सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते.न्युज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले

Comments
Post a Comment