अकोले_गर्दी,उत्साह,उत्सुकता आणी भविष्यातील राजकारणाचा खेळ

अकोले तालुक्यातील जिल्हा बँकेसाठी मतदान झाले असुन या निवडणूक प्रक्रिये दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या आहेत.ठराव झालेले मतदार हे सहलीवरुन सकाळीच मतदानासाठी पोहचले तर दुसरीकडे आमदार किरण लहामटे हे एकाकी पडल्याच चिञ दिसुन आल आहे.आपल्याच पक्षात उभे दोन गट पडल्याने आमदार किरण लहामटे  यांच्या समोर पेच उभा राहिला होता.माञ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या वारसानुसार ही लढत त्यांनी लढवली आहे.आमदार लहामटे यांना अपेक्षे पेक्षा जास्त मते पडतील अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.उद्या कोणाचाही गुलाल असला तरी आमदार लहामटे यांनी दिलेली एकाकी झुंजीची चर्चा सध्या अकोलेत सुरु आहे.सध्या अकोले जिल्हा बँकेच्या निमित्ताने अजित पवार पक्षात,गटात मराठा-आदिवासी असे दोन गट पडले आहेत.माञ विजयी होणारा उमेदवार हा ५८/६०-घेणार तर उरलेली मते असा पराभव होणारा उमेदवार ३४/ते ३५ हा  दरम्यानच्या आसपास असू शकतो.अकोले तालुक्यात गायकर गटातील माञ ५/८मतदान फुटल्याची चर्चा सध्या सुरु आहे.विजय कोणाचा हे माञ आम्ही कोणाची ही एकतर्फी बातमी करणार नाही नाव हे कोणाचे ही घोषित करणार नाही.कारण आम्ही कोणतेही ज्योतिष्य नाही किंवा या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आम्ही फक्त तर्कशास्त्राच्या अभ्यासाने सांगत असतो
-----------------
.आदिवासी समाज्यासाठी राखिव मतदार संघ असताना ही खुल्या जागेवर आमदार किरण लहामटे यांनी आपला उमेदवारीचा अर्ज ठेवल्याने मराठा व आदिवासी असा वाद अकोले तालयक्यात रंगताना दिसुन आला.त्यात माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे माजी संचालक अमित भांगरे व मराठा नेते सिताराम गायकर हे एकञ येत आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात बंड पुकारल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात मोठा टिव्स्ट आला.त्यात या तिघांना ही विखे थोरात या पॅटर्नची सात मिळाली यामुळे अहिल्यानगर जिल्हात खासदार निलेश लंके आणि आमदार किरण लहामटे हे बाजूला फेकले गेल्याचे चिञ पहायला मिळाली आहे.
----—---------
जिगरबाज आमदार लहामटे
---------
प्रस्थापित व्यवस्थेला अव्हान देणाऱ्या माणसांची नेहमी इतिहासात होत असते.खुल्या जागेवर लढून त्यांनी त्यांना न पटलेल्या विचारांचा सामना केला आहे.मराठा आदिवासी वाद पेटलेला असताना ही त्यांनी या बद्दल भाष्य केले नाही,जि्ल्हा बँकेचे राजकारण चालु असताना ही त्यांनी गायकर यांच्यावर ताशेरे ओढले नाहीत,निवडणूक ही निवडणुकीच्या जागेवर योग्य आहे ,वैचारीक संस्कृत असलेल्या तालुक्याचे व्रत त्यांनी जपण्याचा प्रयन्न त्यांनी केला आहे,बिनविरोध या श्बदाचा अर्थच असा होतो कोणी ही समोर लायकीचा नाही त्यामुळे हा श्बदच खोडून काढणाऱ्या आमदार किरण लहामटे यांच्या विषयी अनेक लोक खाजगीत बोलताना सांगत आहे.ज्या पैलवानासमोर कुस्ती लढण्यासाठी उभे राहत नसताना. तुम्ही राहणे ही तुमच्या धाडसाची क्षमता असते.पण न उभे राहणे हा तुमच्या हिंमत नसल्याचा पुरावा असतो.आमदार लहामटे हे जिगरबाजाप्रमाणे लढले आहेत.पराभव हा परीक्षा घेत असतो आणखी मोठी तयारी आणि शिकण्यासाठी यामुळर कोण यशस्वी होणार या उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---—-----
"भविष्यतील जिल्हा परीषद आणि राजकारणावर परीनाम"गायकरांचा ठसा" की "आमदार लहामटेंचा ठसा"
----------
अकोले तालुक्यात जिल्हा परीषद व पंचायत समिती अनेक जागा या आदिवासी मतदार संघासाठी राखिव असुन आजचा आदिवासी मराठा हा जातीवाद जाणीवपूर्वक पेरल्यामुळे याचा परीनाम हा जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकांवर १००%होणार यावर सध्या अकोले तालुक्यातील पारा,पारावर गप्पा चालु आहे,आमदार किरण लहामटे यांनी जरी लोकशाही आणि संवैधानिक अधिकाराने ही निवडणुक लढवली असली तरी स्थानिक राजकारण आणि समाजकारणाची स्थिती पाहता मराठा बहुल भाग हा विधानसभा आणि लोकसभेत मोठी निर्णायक भुमिका बजावत असतो,माञ मराठा बहुल भागातील नेत्यालाच प्रतिअव्हान दिल्याने ही जिल्हा बँकेची निवडणुक ही जातिवादाला रंग देणारी ठरली आहे.भविष्यातील राजकारणाला अर्थात विधानसभेला आदिवासी समाज आणि मराठा समाज्याने ठरवलेला उमेदवार हा सामाना पहायला मिळणार आहे.त्यातच आमदार लहामटे हे जरी आज प्रस्थापित व्यवस्थेला अव्हान देत असले तरी आदिवासी भागातील ठराव व कामांच्या जोरावर आमदार किरण लहामटे यांना जिल्हा बँकेत आदिवासी समाज तारणार का?मराठा लोकसंख्यने जास्त समजलेल्या गावात आमदार साहेबांच्या सोबत ठराव किती याचीच चर्चा सध्या अकोले तालुक्यात सुरु आहे.या निकालाची चर्चा जरी सुरु असली तरी फक्त आजची राञ ही फक्त विश्लेषणासाठी असणार आहे.विजय कोणाचा आणि पराजय कोणाचा हा विषय गौण असला तरी उद्या माञ अकोले तालुक्यात उद्या गुलालाचा धुराळा मोठा उडणार आहे कारण आमदार किरण लहामटे हे माजी आमदार पिचड यांच्या कडे असलेली चाळीस वर्षाची सत्ता उलथून निवडणुकीत डिपाॅजिट जप्त करुन जिंकले होते.तर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सितारामपाटिल गायकर हे मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी आमषार लहामटे यांच्या सोबत होते आणि आपण विधानसभेत साथ दिलेल्या नेत्याने आपल्या मुलीच्या विरोधात निवडणुक लढवावी हे पाटिल यांच्या जिव्हारी लागले असणार यात कोणतीही शंका नाही म्हणूनच ही निवडणुक प्रतिष्ठा आणि अस्मितेची अकोले तालुक्यात बनली होती.उद्या माञ गुलाल हा नुसता विजयाचा नसेल तर तो घेतलेल्या बदल्याचा असेल हे माञ नक्की...गायकर हे राजकारणात संयमी आणि शांत व्यक्तीमत्व म्हणुन ओळखले जाते पण ते जेवढे शांत तितकेच घातक आहेत.शांतता हे घातकाची पहिली तयारी असते.त्यामुळे गायकरांच्या विरोधात लवकर कोणी जात नाही.गायकर हे शातंतेत क्रांती करणारे स्फोटक व्यक्तीमत्व असुन या स्फोटकाचा नाद कोणी लवकर कोणी अकोले तालुक्यात कोणी करत नाही
-----------------
राजकारणातुन आपण काय शिकावे?
--------
गायकर आणि लहामटे यांना दोघांच्या ही जवळच्या माणसांनीच धोका दिला आहे.गायकर यांचे नातेवाईक हे शेटे, चौधरी हे गायकरांपासुन लांब गेले.कोणी दुखावल जात,कोणी आत्मस्वाभिमानाने दुखावला जातो.राजकारण हे राजकारणाच्या जागी ठिक असत पण त्यातुन बाहेर पडण्याचे रस्ते कमी असतात.पैस्याच्या जोरावर समाजकारणाचा,राजकारणाच्या व्यवस्था निर्माण झाल्यामुळे ख-या सहकाराचा कधी गळा घोटला जातो हे आपल्या लक्षात येत नाही.आज विरोधात असणारे नेते ऎकमेंकाच्या शेजारी अलिकडेच सोबत बसणार आहे,नेते राजकारणासाठी फक्त गावपुढारी यांचा वापर करत असतात पण गावपातळी तुम्हाला दुरावलेले जाता आणि त्यावेळी वरिष्ठ पातळीवर खिलाडूवृत्तीने राजकारण करणारा एक ही नेता हा तुमचा नसतो,तुमच्या समस्या अडचणी या तुम्हांलाच मिटवाव्या लागतात, राजकारण हा एक खेळ असतो,तो खिलाडूवृत्तीने खेळला जावा तो नसल्याच्या भावनेने कोणी ही घेऊ नये.
--------
दादा असते तर
----
प्रसाशन,सहकार,कायदा,आणि शिस्त 
आज या जिल्हा बँकेच्या निमित्ताने स्व.दादांची आठवण न होणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा अपमान असेल,म्हणून दादांची आठवण होणे साहाजिकच आहे,आज दादा असते तर कदाचित जिल्हा बँकेची निवडणुक ही अकोले तालुक्यात बिनविरोध झाली असती,दादांना राजकारण,घर आणि समाजकारण यात शिस्त आवडायची,जे त्यांना नाही आवडत ते दादा जवळचा असो की लांबचा सष्टपणे सांगायचे, बोलायचे,दादा गेले पण दादांनी आपल्या श्बदांनी येणाऱ्या पिढीला संदेश दिला "राजकारण लय वंगांळ आहे,तुम्ही मुलांना शिकवा,व्यवसाय करा"कारण राजकारण उकळून पिणाऱ्या माणसानर जाताना हा मोठा संदेश दिला आहे.म्हणूनच राजकारणात न पडता प्रत्येक व्यवसायात,मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.उद्या बाकी अकोले गुलालात रंगणार अकोलेला, जिल्हा बँकेला सहकारातील संजीवनी मिळणार की जिल्हा बँकेसाठी आशेचा किरण उदयाला येणार...
---—-------
जिल्हा बँकेत काम चांगले केले तर ही केवलवाणी धडपड का?
-----
गायकर यांनी जिल्हा बँकेत व अकोले तालुक्यातील संस्थामध्ये चांगले काम केले असले तर गायकर यांना स्वतः च्या मुलीच्या विजयासाठी एवढा जीव का काढावा लागला हा मोठा प्रश्न आहे.गायकर हे स्वतः दहा वर्ष जिल्हा बँकेत राहिले आहेत,स्वतः चेअरमन पण राहिले आहेत मग त्यांना एवढा जिल्हा बँकेत जाण्याचा अट्टाहास कोणाला ही अजून कळला नाही, आपली मुलगी एका प्रशासकीय अधिकारी यांची पत्नी असताना ही वारस म्हणून जिल्हा बँकेत का धाडावे वाटले हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.मानसपुञ,कार्यकर्ते यांना गायकर यांना का जिल्हा बँकेत पाठवावे वाटले नाही हा मोठा प्रश्न आहे.स्वतः ला आम्ही माणसपुञ म्हणवणारे दोन पुञांपैकी एक जण विरोधात दिसुन आला तर एक तालुका प्रमुख म्हणून मिरवणारा आणि कारखान्याच्याच्या निवडणुकीत संचालक केले नाही म्हणून रड-गाणे गाणारा मानसपुञ आज त्यांच्या सोबत दिसून आला आहे.विचारावर ठाम नसलेल्या या मानसपुञांवर तालुक्यातील जनतेने का विश्वास ठेवावा.
-------
आर्थिक घोडेबाजार आणि जिल्हा बँक
------
आज सकाळीच लक्झरी बस मधून प्रवास करत काही ठराव झालेले मतदार हे अकोले तालुक्यात दाखल झाले आणि त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.त्या मंडळी या चांगल्या प्रतिष्ठित घरातील,घरी,दारी सधन दिसुन आले, माञ त्यांनी सहल व आर्थिक आमिषाना बळी पडणे ही अकोले तालुक्यातील ग्रामिण भागात चर्चा आहे.अकोले तालुक्यात आता माञ या पुढिल निवडणुका या आर्थिक घोडेबाजाराच्या असणार यात यामुळे शंका उरली नाही.स्वतला गाव पुढारी व माझा माणुस,माझा ठराव म्हणविणाऱ्या गाव पुढा-यांना ही ठराव झालेले मतदार आर्थिक अमिषापोटी ताब्यात नसल्याच दिसुन आल आहे.पण एवढा सगळा अट्टाहास सहकार लोकांसाठी टिकवण्यासाठी चालु आहे का?सहाकार आणि राजकारण हे हातात हात घालुन काम करत असेल तर सहकार चालवण्यासाठी खरच घर घालुन धंदा करणे, म्हणजेच सहकार चालवण्यासाठी एवढ
 खर्च पुढारी करतात हे विशेष आहे.काल पर्यंत आलेल्या माहिती नुसार हा घोडेबाजार हा १५. लाख रूपयांपर्यत गेला असल्याच चिञ आहे यामुळे या नेते मंडळींनी जिल्हा बँकेत का जायचय हे जनतेला कळल आहे.सहलीला गेल्यानंतरचे अनेक गावपुढारी यांचे प्रताप हे त्यांच्या मिञाना फोटो पुरवल्याने व्हायरल झाले असल्याने हा केवढा अट्टाहास जिल्हा बँकेसाठी केला जातोय.सहकाराकडुन समृध्दी कडे नाही तर सहकाराकडुन आर्थिक की वृध्दीकडे अस सगळा प्रवास हा अकोले तालुक्यात आज निवडणुकीच्या दरम्यान दिसुन आला आहे.
 क्रमशः

Comments

Popular posts from this blog

अकोले-"नाव मोठ लक्षण खोट"नावाने गाजलेल्या पतसंस्थाचा कारभार खोटा

अकोले-जिल्हा बँकेसाठी संमिश्र ठराव...कोणाचे पारडे ठरणार जड

अकोले-लोखंडे-पिचड, लहामटे -शिंदे लढत, शेटेंची माघार