Posts

Showing posts from October, 2024

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अगस्ती साखर कारखान्याच्या 2022-23 मुळीच्या कार्यक्रमात केलेल्या सुचनांचे अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाने पालन केले का?-संदिप भाऊसाहेब शेणकर.

Image
अकोले तालुक्यातील भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे या मुद्द्यावर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी स्वतंत्र पॅनल स्थापन करून निवडणुका लढावल्या, त्यात व्हा. चेअरमन विजयी झाले, व पहिले बहुजन समाजाचे चेअरमन झाले, आणि विजयोत्सवं साजरा करण्यासाठी थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनाच मुळीच्या कार्यक्रमला बोलवले, दादा आले व अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले व अनेक गोष्टींबाबत नवंनिर्वाचित संचालक मंडळाचे अत्यंत कठोर भाषेत कान देखील टोचले, पण त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याचे आज दिसून येत आहे, अजितदादा पवारांनी त्यांच्या भाषणात, मटेरियल खरेदी बाबत, भ्रष्टाचाराबाबत व मनमानी नोकर भरतीबाबत अनेक मुद्दे मांडले होते परंतु आज त्यात कोणत्याही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही, आज कारखान्यात इंजिनीरिंग व उत्पादन विभागातील कर्मचाऱ्यांएवढे तर अगस्ती कारखान्यात लिपिक व अधिकारी आहेत तर कारखाना चालवणार कोणं..? त्याहीपुढे अनेक वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये एकच मुद्दा गाजत आला आहे की कारखान्यातील भ्रस्ट अधिकाऱ्यांचे का...