महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अगस्ती साखर कारखान्याच्या 2022-23 मुळीच्या कार्यक्रमात केलेल्या सुचनांचे अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाने पालन केले का?-संदिप भाऊसाहेब शेणकर.

अकोले तालुक्यातील भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे या मुद्द्यावर अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी स्वतंत्र पॅनल स्थापन करून निवडणुका लढावल्या, त्यात व्हा. चेअरमन विजयी झाले, व पहिले बहुजन समाजाचे चेअरमन झाले, आणि विजयोत्सवं साजरा करण्यासाठी थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनाच मुळीच्या कार्यक्रमला बोलवले, दादा आले व अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले व अनेक गोष्टींबाबत नवंनिर्वाचित संचालक मंडळाचे अत्यंत कठोर भाषेत कान देखील टोचले, पण त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याचे आज दिसून येत आहे, अजितदादा पवारांनी त्यांच्या भाषणात, मटेरियल खरेदी बाबत, भ्रष्टाचाराबाबत व मनमानी नोकर भरतीबाबत अनेक मुद्दे मांडले होते परंतु आज त्यात कोणत्याही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही, आज कारखान्यात इंजिनीरिंग व उत्पादन विभागातील कर्मचाऱ्यांएवढे तर अगस्ती कारखान्यात लिपिक व अधिकारी आहेत तर कारखाना चालवणार कोणं..? त्याहीपुढे अनेक वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये एकच मुद्दा गाजत आला आहे की कारखान्यातील भ्रस्ट अधिकाऱ्यांचे काय..? दिवासेंदिवस त्यांची संख्या वाढली आहे.अगस्ती कारखान्याचा इतिहास पहिला तर असे जाणवते बाविस्कर साहेब कार्यकारी संचालक म्हणून होते तोपर्यंत अगस्ती कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, मात्र त्यांच्यानंतर भास्कर घुले हे कार्यकारी संचालक म्हणून आले व कारखान्याची सर्व मालमत्ता तारण ठेवून कर्ज उभारले, व त्यातून कारखान्याची गाळाप क्षमता वाढवली व आसवनी (इथेनॉल) प्रकल्प उभारला त्यात मोठा भ्रस्टाचार करून पळ काढला...! वास्तविक पाहता अगस्ती कारखान्याने जे खातेप्रमुख मागच्या हंगामात काढले त्यांचा भ्रष्टाचार भास्कर घुलेंच्या नखाऐवढा देखील नाही, वास्तविक पाहता त्यांच्याकडूनच हे अधिकारी शिकले असावेत, राजाच प्रामाणिक नसेल तर राजाचे प्रधान मंडळ प्रामाणिक राहिल का..? याही वार्षिक सभेत प्रत्येक वक्त्याने भ्रस्टाचार मुद्यालाच केंद्रबिंदू ठेवला असताना देखील कारखान्याकडून कोणतीही कार्यवाही नसेल आणि आज हे चारही अधिकारी समाजात मोकळे फिरत असतील व त्याची झीज कर्मचारी व शेतकरी खात असतील तर मग आज अकोले तालुक्यातील या नेत्यांना प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या उपमुख्यमंत्री महोदयांना अकोले तालुक्यात बोलावण्याचा नैतिक अधिकार उरतो का..? असा सवाल संदिप भाऊसाहेब शेणकर यांनी उपस्थित केला. आता मा. अजितदादा यांनाच विनंती आहे तुम्हीचं योग्य तो निर्णय घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प