अकोले-विधानसभेचा खरा ग्राऊंड रिपोर्ट
अकोले-अकोले तालुक्यातील सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत.अकोले तालुक्यात सध्या प्रचारसभांच्या माध्यामातून वैयक्तिक, व्यक्तीगत,कौटुंबिक टिका टिप्पणी यावर भर दिला गेल्याच सध्या दिसुन येत आहे माञ अकोले तालुक्यात या अगोदर अपवादानेच असे प्रकार झाल्याच पहायला मिळत आहे.अकोले तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात सध्या एकुण नऊ उमेदवार आहेत माञ प्रमुख लढतीमध्ये आमदार किरण लहामटे,अमित भांगरे,वैभवराव पिचड,मारुती मेंगाळ,मधुकरराव तळपाडे हे आहेत.आमदार किरण लहामटे यांच्या विकासकामांना प्रभावित होऊन मोठा समुदाय हा सध्या त्यांच्या बरोबर आहे लाडकी बहिण योजनेमुळे त्यांना महिलांकडुन मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.बाजारतळ,बस स्टँड,अकोले शहरातून जाणारे रस्ते यामुळे डोळ्याने दिसणारा विकास अनेकांना दाखवला असल्याच चिञ आहे तर त्यांच्या महायुतीतील घटक पक्ष म्हणजेच शिंदे गट व भाजपा ही निम्मी वैभवराव पिचड यांच्या बरोबर निघून गेली आहे यामुळे अचानक पडलेल्या भगदाडामुळे महायुतीचा त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच दिसत आहे माञ आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जिवावर आमदार लहा...