अकोले-विधानसभेचा खरा ग्राऊंड रिपोर्ट
अकोले-अकोले तालुक्यातील सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत.अकोले तालुक्यात सध्या प्रचारसभांच्या माध्यामातून वैयक्तिक, व्यक्तीगत,कौटुंबिक टिका टिप्पणी यावर भर दिला गेल्याच सध्या दिसुन येत आहे माञ अकोले तालुक्यात या अगोदर अपवादानेच असे प्रकार झाल्याच पहायला मिळत आहे.अकोले तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात सध्या एकुण नऊ उमेदवार आहेत माञ प्रमुख लढतीमध्ये आमदार किरण लहामटे,अमित भांगरे,वैभवराव पिचड,मारुती मेंगाळ,मधुकरराव तळपाडे हे आहेत.आमदार किरण लहामटे यांच्या विकासकामांना प्रभावित होऊन मोठा समुदाय हा सध्या त्यांच्या बरोबर आहे लाडकी बहिण योजनेमुळे त्यांना महिलांकडुन मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.बाजारतळ,बस स्टँड,अकोले शहरातून जाणारे रस्ते यामुळे डोळ्याने दिसणारा विकास अनेकांना दाखवला असल्याच चिञ आहे तर त्यांच्या महायुतीतील घटक पक्ष म्हणजेच शिंदे गट व भाजपा ही निम्मी वैभवराव पिचड यांच्या बरोबर निघून गेली आहे यामुळे अचानक पडलेल्या भगदाडामुळे महायुतीचा त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच दिसत आहे माञ आपल्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जिवावर आमदार लहामटे हे आपली विजयाचा अजेंडा घेऊन नवे व्हिजन मांडत आहे.लोकसभेच्या माञ शिंदे गट व भाजप सोबत नसल्याचा फटका लहामटे यांना बसु शकतो याला काही दिवस झालेल्या लोकसभेची पार्श्वभूमी असल्याच दिसुन येत आहे कारण लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार असलेले सदाशिवराव लोखंडे हे उमेदवार असताना आमदार किरण लहामटे यांचे समर्थक कार्यकर्ते हे महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उत्कर्षाताई रुपवते यांचा प्रचार करताना दिसुन आले होते.यामुळे वैयक्तिक समर्थन जरी लहामटे यांना असले तरी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता इतर उमेदवारांचा प्रचार केल्याचा वचपा आता शिंदे गट व भाजपाने काढला आहे.मणिपूर व आदिवासी वनजमिनी यामुळे भाजपावरील नाराजी माञ त्यांना आदिवासी पटदयात तारणार का? हा ही मोठा सवाल आहे. दुसरीकडे पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे यांच्याकडे एक युवा व कर्तबगार युवक म्हणून अमित भांगरे यांच्याकडून जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.भविष्यात युवकांसाठीचे व्हिजन व ग्रामीण भागाला पर्यटनाला जोडण्याचे त्यांचे सप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना आमदारकीची गरज असल्याच ते सांगत आहेत महिलांच्या जीवनात अर्थकारणाला असलेल महत्व ओळखून ते भविष्यात महिला वर्गासाठी गावोगाव गाय,म्हशीच्या दुधाच्या डेअरी काढणार आल्याच त्यांनी ते सांगत आहेत.माञ स्वर्गीय अशोकराव भांगरे आपल्यात नसल्याची कमतरता अमित भांगरे यांना जाणवत आहे अमित भांगरे हे राजकारणात नवखे असल्याने व स्वर्गीय भांगरे साहेब नसल्याचा फायदा हा विरोधकांनी उठवत कौटुंबिक, व्यक्तीगत, वैयक्तिक टीका यावर भर दिला आहे माञ सहजच एक प्रश्न मनामध्ये डोकावून जातो खरच स्वर्गीय अधिकारावर भांगरे आज असते तर विरोधकांची कुटुंबात पर्यंत जाऊन टीका करण्याची मजल झाली असती का?तर कोणी ही अशी धडगत केली नसती माञ अमित हा राजकारणात नवखा असल्याने प्रचार व निवडणुकीपासुन इतर लक्ष भटकवण्यासाठी हा उपद्याप केला जात आहे.माञ अजून महाविकास आघाडीचे नेते यांनी अगस्ती कारखान्याच्या व्हा.चेअरमन सुनिताताई भांगरे यांची भाषणे ही प्रचाराच्या दरम्यान कमी प्रमाणात जाणवत आहेत.सुनिताताई भांगरे यांचा एक मोठा चाहता वर्ग असुन त्याच बरोबर भांगरे ताईंचा एक मोठा महिला बचत गट व कोरोना कालावधीत मदत केलेले मोठे संघटन आहे माञ या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मेळावा घेणे आवश्यक असतात तशी कृती कुठे ही होताना दिसत नाही.तर तिसरी कडे आपल्या स्वकर्तुत्वाने व पारंपारिक सामाजिक वारसा जपत माजी आमदार वैभवराव पिचड हे निवडणुकीच्या रणांगणात आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे उतरले आहेत.माजी मंञी मधुकरराव पिचड व माजी सरपंच हेमलताताई पिचड हे आपले दोन्ही आधारस्तंभ हे वैभवरांवाचे आजारी आहेत आदिवासी समाज्याबरोबरच इतर समाज्यात केलेले विकासकामे त्यातुन झालेला सुजलाम सुफलाम् झालेला माजी मंञी पिचड साहेबाच्यामुळे झालेला तालुका व चाळीस, तीस वर्षापूर्वची शेती व सामाजिक आजची व पूर्वीची लक्षात घेऊन अनेक जुने,जाणते कार्यकर्ते हे पुन्हा पिचड घराण्याकडे आकर्षीत झाले आहेत माञ चाळीस, तीस वर्षापासून जपलेला कार्यकर्ता २०१९च्या वेळी सोबत नसलेला कार्यकर्ता हा माजी मंञी पिचड यांच्या संकटाच्या काळात आज धावून आला आहे.आपल्या कुटुंबावर पडलेला संकट आणी कार्यकर्ते व कुटुंब या दुविधेत पडलेल्या कुटुंबाची साथ माजी आमदार,माजी मंञी पिचड यांच्या कुटुंबाने ओळखून राजकारणात येण्याची इच्छा ही नसणारे यश पिचड,मधुरा पिचड,गिरिजा पिचड व इतर कुटुंब हे पुढे आले आहे.आपले आजोबा हाॅस्पिटल मध्ये तर वडिल वैभवराव पिचड हे काळजी घेण्यात व्यस्त माञ तुम्ही आजोबांची काळजी घ्या तुमचे सप्न आम्ही पूर्ण करु हे सप्न मनात घेऊन आज ही कोवळी मूल ही खडोपाडी गावात जाऊन आपल्या वडिल चुलते यांचा प्रचार करत आहेत.पेसा,आदिवासी समाज्याचे स्वतंञ्य बजेट,धनगर विरोधी भुमिका व बहुजनांना न्याय यामुळे पिचड यांची प्रतिमा नेहमीच आदिवासी समाज्यात उंच राहिली आहे.आदिवासी समाज्याचे दैवतच म्हणून माजी मंञी पिचड यांना ओळखले जाते तर त्यांच्या आजारपणाच्या काळात झालेली टीका विविध पक्षातील वैचारिक कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागली,वाईट काळात,आजारपणात शञूच्या घरात जाऊन बसणारी असलेल्या संस्कृती अनेकांना पटली नाही यामुळे विविध पक्षातील कार्यकर्ते हे पिचडंच्या सोबत छुप्या पध्दतीने गेली आहेत तर राजकीय अपघात घडावा तसा आमदार किरण लहामटे व माजी आमदार वैभवराव पिचड यांचे चिरंजीव यश पिचड यांची भेट झाल्यानंतर यश पिचड आमदार लहामटे यांचा चरणस्पर्श केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो अनेकांना संस्काराचे दर्शनाचा देऊन गेला आपले आजोबा आजारी असताना त्यांनी "चाळीस वर्ष काहीच केल नाही" हा विषय मांडणार्या व्यक्तीचे दर्शन हा अकोले तालुक्यात विषयच बनलात माञ यश हे कोवळ पोरग आपल्या वडिल व आजोबांचे सप्न साकार करण्यासाठी रानमाळ तुडवतय हे अनेकांना भारावून ठेवणारी गोष्ट आहे.माञ पिचडांचे कार्यकर्ते आज झापटुन गेल्यासारखे वाडी,वस्तीवर पोहचत आहे जणु आपणच स्वत:विधानसभेला उभे असल्याच वार त्यांच्यात भिनलेले आहे.यामुळे आपल्या नेतृत्वाच्या दुखात व सुखात ही निष्ठा ठेचणार्या कार्यकर्ते यांचे सर्वमान्य कौतुक होत आहे.
आपण चौथीकडे पाहिल ते युवानेते मारुती मेंगाळ हे स्वत:अपक्ष उमेदवार आहेत एका सर्व सामान्य कुटुंबातून आलेला हा युवक आपले स्वत:अस्तित्व आज तपासून घेण्यासाठी विधानसभेच्या रणांगणात दाखल झाला आहे समाज्याची गर्दी आपण रस्त्यावर खुप जमवतो माञ त्या गर्दी माझे दर्दी किती आहेत हे मारुती मेंगाळ समाज व राजकीय पक्षांना दाखवून द्यायचे आहे.ठाकर समाज्याला आज पर्यंत न मिळालेली प्रस्थापित पक्षाकडुल उमेदवारी ही ठाकर समाज्याची खंत आह त्यांनी अपक्ष उमेदवारी करुन भरून काढली आहे तर कधी काळी वरीष्ठ पोलिस अधिकारी म्हणून काम पहाणार एक तालुक्याचे नाव रोषणाई करणारा अधिकारी मधुकरराव तळपाडे यांना राजकीय दलदलीत आणुन त्यांना राजकीय उदध्वस्त करणारा एक राजकीय मंडळींचाही संच आज त्यांना सोडून गेला आहे माञ तळपाडेंचे वैयक्तिक करिअर बरबाद करुन त्यांचे राजकीय करिअर ही बरबाद करु पाहणार्या अकोले तालुक्यातील पुढार्यांच्या टोळ्या या जो पर्यंत संपुष्टात आणण्यासाठी मधुकराव तळपाडे आपल्या कडवट व कटु शिवसैनिकांना घेऊन आपला गड लढवत आहेत आज ज्यांनी राजकारणात आणल,नोकरीचा राजिनामा द्यायला लावला तेच आता विरोधकांच्या स्टेज वर उभे राहून टीका करतात त्यावेळी माञ सामान्य माणूस म्हणुन तळपाडे हे योग्य जागेवर असुन त्यांना साथ देण्याची गरज असल्याच एक वर्ग बोलत आहे.या सर्व वरील गोष्टी पाहता आज कोणत्याही उमेदवाराला कमी लेखून चालणार नाही आज सर्व उमेदवारांची हे मातब्बरच समजुन चालाचला लागणार आहे.जो जनते पर्यंत आपले व्हिजन पटवून देईल, महत्व पटवून देईल तोच भविष्यातील आमदार असणार आहे.
क्रमांक:भाग १
Comments
Post a Comment