Posts

Showing posts from April, 2025

अकोले-आज सुरेश अण्णा धस उंचखडक बु मध्ये काळभैरवाच्या याञेला येणार..

Image
अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे पहिल्यांदाच काळभैरवनाथ महाराज यांची यात्रा मोठी साजरी केली जात आहे. दरवर्षी काठीची मिरवणूक निघते, परंतु यंदा तरुणांनी यात्रेला सामाजिक स्वरुप दिले आहे. या यात्रेत गावातील एमपीएससी, सरळसेवा आणि अन्य सरकारी नोकरी करणारे यशस्वी व्यक्तीमत्व तसेच गावातून बाहेर पडलेले यशस्वी उद्योजक यांचा नागरी सन्मान आयोजित केला आहे. यासाठी सुरेश अण्णा धस (आष्टी विधानसभा मतदारसंघ संघ, बीड) तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ तसेच अगस्ती दुधसंघाचे चेअरमन वैभव पिचड उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य ॲड. सागर शिंदे यांनी दिली. उंचखडक बु हे गाव प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे, श्री. सद् गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने गाव शापमुक्त झाले आहे. पुर्वी रांडकीचे उंचखडक म्हणून हे गाव कुपरिचित होते, मात्र यशवंत बाबा महाराज यांनी काळभैरवनाथ महाराज यांच्या मंदिरात तपश्चर्या केली आणि रिद्दीसिद्दी प्राप्त केली, गावाला शापमुक्त केले. मात्र, गेली कित्तेक शतक काळभैरवनाथांचे मंदिर खिन्न आवस्थेत जिर्ण झाले ह...