अकोले-आज सुरेश अण्णा धस उंचखडक बु मध्ये काळभैरवाच्या याञेला येणार..
अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथे पहिल्यांदाच काळभैरवनाथ महाराज यांची यात्रा मोठी साजरी केली जात आहे. दरवर्षी काठीची मिरवणूक निघते, परंतु यंदा तरुणांनी यात्रेला सामाजिक स्वरुप दिले आहे. या यात्रेत गावातील एमपीएससी, सरळसेवा आणि अन्य सरकारी नोकरी करणारे यशस्वी व्यक्तीमत्व तसेच गावातून बाहेर पडलेले यशस्वी उद्योजक यांचा नागरी सन्मान आयोजित केला आहे. यासाठी सुरेश अण्णा धस (आष्टी विधानसभा मतदारसंघ संघ, बीड) तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ तसेच अगस्ती दुधसंघाचे चेअरमन वैभव पिचड उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य ॲड. सागर शिंदे यांनी दिली.उंचखडक बु हे गाव प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे, श्री. सद् गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने गाव शापमुक्त झाले आहे. पुर्वी रांडकीचे उंचखडक म्हणून हे गाव कुपरिचित होते, मात्र यशवंत बाबा महाराज यांनी काळभैरवनाथ महाराज यांच्या मंदिरात तपश्चर्या केली आणि रिद्दीसिद्दी प्राप्त केली, गावाला शापमुक्त केले. मात्र, गेली कित्तेक शतक काळभैरवनाथांचे मंदिर खिन्न आवस्थेत जिर्ण झाले होते. त्यानंतर भाऊमामांना खरात, प्रताप देशमुख यांच्यासह अन्य प्रतिष्ठीत व्यक्तींनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून मोठे मंदिर उभे केले आहे. यावर्षी या मंदिराचा जिर्णोद्धार होणार आहे. त्याचेच अवचित्य साधून यंदा तरुणाई एकवटली आहे.यंदा मोठी यात्रा आयोजित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. उद्या दि. 11 एप्रिल 2025 रोजी सायं. 4 वाजता हगामा, 7 वा. भारुड, 8 वाजता सुरेश अण्णा धस यांचे हस्ते काही नागरी सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे. 9 वा. महाप्रसाद, त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व काठीची मिरवणूक असा उपक्रम आयोजित केला आहे. बालकांच्या आनंदासाठी रहाट, पाळणे, मिकी माऊस, जंपींग अशी काही खेळणी राहणार आहे. काही खाद्यांचे स्टॅल आणि अन्य सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पत्रकार परिषदेला सोपान देशमुख,विशाल दशमुख अनिल देशमुख, आबासाहेब मंडलिक, विशाल खरात, विजय देशमुख, सागर देशमुख, नवनाथ मंडलिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment