देवठाण-बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय कविता गांगड मयत
अ कोले तालुक्यातील देवठाण गावातील शेळके वस्ती नजिक राहणाऱ्या लहानु पोपट गांगड यांच्या कविता गांगड या चार वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मुर्त्यु झाल्याची घटना समोर आली आहे.देवठाण येथिल रहिवासी असणाऱ्या मोहन शेळके यांच्या वस्ती नजिक ही घटना घडली आहे.सदर घटना कळताच ग्रामस्थ व वनखाते हे तत्परने घटनास्थळी दाखल झाले माञ शोधाशोध केल्या नंतर कविता गांगड या मुलीचा मृतदेह महेश मोहन शेळके यांच्या उसाच्या शेतामध्ये ३००मीटरवर आढळून आला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते व देवठाण ग्रामस्थ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे यापूर्वी ही देवठाण गावतील रामहारी काळे यांच्या वस्तीवर ही हल्ला झाला होता या हल्यात विठावाई रामहारी काळे यांचा मुर्त्यु झाला होता वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे अकोले तालुका हा भयभयीत झाला आहे.तरी वनविभागाने तातडीने कारवाई करत नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी पंचायत समितीचे अरुण शेळके, किसान सभा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जालिंदर बोडके,सुधीर शेळके, महेश सोनावणे,किशोर घावटे आदिंनी धावपळ करत ग्रामीण रुग्णालय कोतुळ या ठिकाणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आह...