उमेद उपक्रमामुळे महिला बचत गटाला नवसंजिवनी

 
काल अकोले  सुंदर अशी उद्योजक महिला आणि मुंबई येथे मॉलचे संचालक यांची एक बायर सेलर मीटिंग पार पडली.या मीटिंगमध्ये तालुक्यातील अनेक महिला त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट घेऊन अतिशय उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.ग्रुपचे संचालक यांनी सुद्धा खूप चांगलं महिलांना मार्गदर्शन केलं महिलांचे उत्पादन समजून घेतली जाणून घेतली.कळसुबाई महोत्सव त्यानंतर रानभाज्या महोत्सव आणि त्यानंतर आज झालेली बायसेलर मीठ ही एक महिलांसाठी नवक्रांती ठरणार आहेयासाठी विशेष मेहनत अविनाश कानवडे सर कासार ताई विदुलाताई यांनी घेतली.काल झालेल्या अकोल्यात उमेदी उपक्रमाच्या अंतर्गत एक उल्लेखनीय बायर-सेलर मीटिंग पार पडली. या बैठकीत अकोल्यातील उद्योजक महिला आणि मुंबई येथील प्रतिष्ठित TGMG मॉलचे संचालक सहभागी झाले.

या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना त्यांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची संधी निर्माण झाली आहे.उमेद चे कुंदन कोरडे साहेब,पशुसंवर्धन विभागाचे डॉ अशोक धिंडले उपस्थित होते.कळसुबाई महोत्सव, रानभाज्यांचा महोत्सव, मंगळागौर, आणि दांडिया महोत्सव अशा विविध उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.हे सर्व उपक्रम आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. पुष्पा लहामटे यांच्या पुढाकारातून राबवले जात असून, तालुक्यात महिलांना स्वावलंबनाचा आत्मविश्वास मिळत आहे.

महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या या प्रवासात 'उमेदी' हे एक प्रभावी माध्यम ठरत आहे.यामुळे अकोले तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ उपल्बध होत असल्याच समोर येत आहे.न्युज सह्याद्री एक्सप्रेस न्युज वेब पोर्टलसाठी संपादक भाऊसाहेब साळवे,उपसंपादक किशोर मोहिते अकोले.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..