अकोलेत १फेब्रवारी रोजी विलास बडे यांचे जाहीर व्याख्यान
अकोले (प्रतिनिधी) अकोले तालुका पत्रकार परिषद व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, अकोले तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पंचायत समिती सभागृह, अकोले येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी न्यूज 18 मराठीचे वृत्तसंपादक , प्रसिद्ध निवेदक विलास बडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते “पत्रकारितेचे वर्तमानकाळातील वास्तव” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य आदींची उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोले तालुका पत्रकार ...