अकोलेत १फेब्रवारी रोजी विलास बडे यांचे जाहीर व्याख्यान

अकोले (प्रतिनिधी) अकोले तालुका पत्रकार परिषद व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, अकोले तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता पंचायत समिती सभागृह, अकोले येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी न्यूज 18 मराठीचे वृत्तसंपादक , प्रसिद्ध निवेदक विलास बडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ते “पत्रकारितेचे वर्तमानकाळातील वास्तव” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मधुकरराव नवले राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, प्रा. बाळासाहेब मेहेत्रे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य आदींची उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोले तालुका पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सदस्य पुढाकार घेत आहेत.पत्रकार दिनानिमित्त आयोजित या जाहीर व्याख्यानातून पत्रकारितेतील बदलते प्रवाह, आव्हाने, जबाबदाऱ्या आणि समाजाशी असलेले नाते याविषयी सखोल विचारमंथन होणार आहे,या कार्यक्रमास पत्रकार, विद्यार्थी,युवक, सामाजिक,राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अ.भा.म. पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,तालुकाध्यक्ष गणेश आवारी,श्रीनिवास रेणुकदास,प्रकाश महाले, प्रकाश आरोटे, संदीप वाकचौरे, चंद्रशेखर हासे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,भाऊसाहेब चासकर,रामलाल हासे, सुनील गिते, गोकुळ कानकाटे, संजय महानोर, विनायक घाटकर, भाऊसाहेब साळवे, ज्ञानेश्वर खुळे, रमेश खरबस, नरेंद्र देशमुख, विनय समुद्र, शुभम फापाळे, युवराज हंगेकर, राजेंद्र उकिरडे, राजेंद्र मालुंजकर,राजेंद्र भाग्यवंत, दिनेश जोरवर, भाऊसाहेब कासार, संदीप देशमुख आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प