अकोले-वीर जवान संदीप गायकर यांना अकोलेत अभिवादन,व्यापारी संघटना,नागरीक व आजी,माजी सैनिक दलाकडुन अभिवादन
अकोले (प्रतिनीधी)-अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर यांना अकोले येथे रोटरी क्लब, अकोले तालुका केमिस्ट व मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमर रहे अमर रहे,संदीप गायकर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या.यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रथम नगराध्यक्ष व अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर, माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, अगस्ति देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व रोटरी क्लब चे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दिपक महाराज देशमुख,रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन आवारी, सचिन देशमुख, सुनील नवले,अमोल देशमुख, गंगाराम करवर, रोहिदास जाधव,डॉक्टर जयसिंग कानवडे, डॉक्टर देविदास नवले, डॉ.किरन पारधी,समीर सय्यद, भारत पिंगळे,दिनेश नाईकवाडी, सचिन आहेर, मयूर रासने,विजय पावसे,माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम घनकुटे, ग्रामीण रुग्णालय अकोलेचे मेडिकल ऑफिसर डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, केमिस्ट असो. अध्यक्ष राजेश धुमाळ, सेक्रेट...