अकोले-देवठाण गावामध्ये कर्मचारी आणि व्यावसायिक फाउंडेशन(देवठाण) तर्फे १०५मुलांना शालेय साहित्याचे वाटप

अकोले-भातोडा नगर, दोडक नदी,देवाची वाडी,गहिनीनाथ नगर तसेच केंद्रशाळा देवठाण ह्या,पाच शाळेमधील 105  गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पाणी बॉटल ,वह्या ,पेन इंग्रजी उजळणी ,मराठी उजळणी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास सोनवणे सर ,रामनाथ काकड सर उपस्थित होते अतिशय स्तुत्य असा उपक्रम मागील वर्षापासून देवठाण गावात राबविला जात आहे अशी भावना महेश सोनवणे सर यांनी व्यक्त केली आहे गावातील कर्मचारी आणि व्यावसायिक यांच्याकडून मदत मिळवून हा उपक्रम सुरू केलेला आहे.साहित्य वाटपाच्या वेळी , फाउंडेशनचे सदस्य संदीप भोर,जुनेद इनामदार,किशोर घावटे,अंकुश. काकड,
 सुधीर अण्णा शेळके, जालिंदर बोडके तुकाराम पाटोळे ,महेश सोनवणे सर,असे अनेक सदस्य उपस्थित होते.तसेच नितीन सहाणे सर ,प्रवीण सहाणे,
नितीन कथले,सचिन बोडके,राजेंद्र महाराज कराड,संजय शेळके प्रकाश शेळके असे अनेक ग्रामस्थ,पालक,व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष ,सदस्य उपस्थित होते.या फाउंडेशनला  देवठाण, गावातील अनेक कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी मदत केलेली आहे .
यामध्ये प्रणिता जगताप ,चेतन साबळे, श्रीधर गायकवाड,अजित सहाणे, गोरक्ष सोनवणे सर , राम देशमुख ,तुकाराम पाटोळे, प्रकाश सोनवणे सर,अतिक इनामदार,चंद्रभान सोनवणे,सचिन जोरवर,राहुल जोरवर,अविनाश बोडके,विकास जोरवर,अमोल देशमुख ,विजय सोनवणे,अशा गावातील अनेक कर्मचारी आणि व्यावसायिक लोकांनी मदत केलेली आहे,भविष्यात हा उपक्रम पुढेही चालू आहे राहील असे महेश सोनवणे सरांनी सांगितले.त्यांनी पालक लोकांना तसेच गावातील दानशूर लोकांना आवाहन केले की राजकारण बाजूला ठेवून ,राजकारण विरहित एकत्र येवून,आपणही या उपक्रमात पुढील वर्षी सहभागी व्हावे आणि गरजवंत विद्यार्थी ह्यांना मदत करावी अशी भावना फाउंडेशनच्या कार्यकर्ते यांनी व्यक्त केली आहे.संपादक किशोर मोहिते,न्यूज सह्याद्री एक्सप्रेस न्यूज पोर्टल.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..