अकोले-वीर जवान संदीप गायकर यांना अकोलेत अभिवादन,व्यापारी संघटना,नागरीक व आजी,माजी सैनिक दलाकडुन अभिवादन

 अकोले (प्रतिनीधी)-अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील वीर जवान संदीप गायकर यांना अकोले येथे रोटरी क्लब, अकोले तालुका केमिस्ट व मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमर रहे अमर रहे,संदीप गायकर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा देण्यात आल्या.यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रथम नगराध्यक्ष व अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर, माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, अगस्ति देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व रोटरी क्लब चे पब्लिक इमेज डायरेक्टर हभप दिपक महाराज देशमुख,रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन आवारी, सचिन देशमुख, सुनील नवले,अमोल देशमुख, गंगाराम करवर, रोहिदास जाधव,डॉक्टर जयसिंग कानवडे, डॉक्टर देविदास नवले, डॉ.किरन पारधी,समीर सय्यद, भारत पिंगळे,दिनेश नाईकवाडी, सचिन आहेर, मयूर रासने,विजय पावसे,माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम घनकुटे, ग्रामीण रुग्णालय अकोलेचे मेडिकल ऑफिसर डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, केमिस्ट असो. अध्यक्ष राजेश धुमाळ, सेक्रेटरी महेश येवले, राजकुमार भळगट, डॉ.रविंद्र डावरे,रविंद्र कोटकर, रवी पूंडे,माजी शिक्षण संचालक सुरेश आवारी,सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर, सुगाव बुद्रुक च्या सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे, डॉक्टर रमा कुलकर्णी, डॉ.सौ.पारधी, सामजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी , शाहीर मुकुंदा भोर, नगरसेवक नवनाथ शेटे,अनिल कोळपकर, ऍक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक भाऊसाहेब चासकर, भैरवनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज चासचे प्राचार्य सुनील चौधरी, भाऊसाहेब नाईकवाडी, प्रशांत चौधरी, दत्ता धुमाळ,आधी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य, रोटरी क्लब अकोलेचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य, केमिस्ट व मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे सह  शहरातील व्यापारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरी क्लबचे संस्थापक व मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. यावेळी सुगाव बुद्रूक सरपंच डॉ अनुप्रिता शिंदे, हभप दिपक महाराज देशमुख, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक, अकोले तालुका सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भास्कर तळेकर आदींनी वीर जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रगीताने या अभिवादन सभेची सांगता करण्यात आली.न्युज सह्याद्री एक्सप्रेस उपसंपादक किशोर मोहिते अकोले

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..