*अकोले-संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार-डाॅ.संदिप कडलग.*
अकोले-वाशिम येथे शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा भव्य स्वरूपात संपन्न होत आहे.या सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संभाजी ब्रिगेड कोणती भूमिका घेणार आणि या मेळाव्यात कशाप्रकारे राजकीय, सामाजिक मांडणी होणार हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.मागील पंचवीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जी बांधणी केलेली आहे; त्यामुळे महाराष्ट्रात जातीय-धार्मिक सलोखा निर्माण झालेला आहे.संभाजी ब्रिगेडचे विचारवंत,अभ्यासक,लेखक,
व्याख्याते,संघटक आणि सर्वात महत्त्वाचे कार्यकर्ते यांनी मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रात सामाजिक विण मजबूत करण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे.महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणात संभाजी ब्रिगेडच्या त्याच सौहार्दपूर्ण भूमिकेची लोकांना आवश्यकता निर्माण झालेली आहे.या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे अभ्यासू आणि तेवढेच आक्रमक वक्ते जी भूमिका मांडतील, त्यामधून महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघेल आणि निश्चितच परिवर्तनाचा संदेश जाईल अशी आशा महाराष्ट्रातील जनता करत आहे.सध्या राज्यातील राजकारणात जी काही अस्थितता निर्माण झालेली आहे ती भरून काढण्यासाठी दीड वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही युती महाराष्ट्रात झालेली आहे.पुढील निवडणुकांमध्ये संभाजी- ब्रिगेड शिवसेना ही युती संयुक्तपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहे.त्या अनुषंगाने या वर्धापन सोहळ्यात संभाजी ब्रिगेडने शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा आमंत्रित केलेले आहे.त्यामुळे या दोन्ही पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी भूमिका या मेळाव्यात मांडतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनता करीत आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर,मुख्य प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे, ,,यांच्यासोबतच संभाजी ब्रिगेडचे अनेक नामवंत व अभ्यासू वक्ते या मेळाव्यात आपले विचार व्यक्त करणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख नेते सुद्धा या अधिवेशनात संवाद साधणार आहेत.
अहमदनगर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, व उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार यांची जिल्ह्याची संपूर्ण ब्रिगेडची टीम वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार कामाला लागलेली आहे सर्व राजकीय पक्ष या वर्धापन दिन सोहळ्याकडे लक्ष देऊन असून या सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे काही प्रमाणात बदलतील असे सर्वांना वाटत आहे.संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ पदाधिकारी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना करीत आहे.अहमदनगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते वाशिममध्ये या अधिवेशनासाठी जाण्यास उत्सुक आहेत. तरी सर्व समाजातील बांधवांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment