अकोले-अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटीत कर्जमाफीच्या रक्कमांचा अपहार
अकोले-अकोले विविध विकास कार्यकारी सोसायटी मध्ये २०१४च्या अगोदर पासूनच मोठा अपहार झाल्याच आता समोर येत असुन कोट्यावधी रक्कमेचा अपहार झाला असुन कर्जदार यांच्याकडून कर्ज हे व्याजासहित वसूल तर करण्यात आले.अशी सुप्त चर्चा काही शेतकरी मंडळीनी न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कडे मांडली आहे.माञ कर्जमाफी झाल्यानंतर ही शेतकरी वर्गाच्या खात्यात अनुदान व कर्जमाफीची रक्कम आलीच नाही.यामुळे पहिल्या कर्जमाफी पासुन या अपहाराची व्याप्ती पाहिली तर ही अनेक कोटी रूपयांपर्यंत जाऊन पोहचणार आहे.सस्विस्तर माहिती अशी की अनेक कर्जदार हे शासनाने घालून दिलेल्या कर्जमाफीच्या अटी,शर्ती यामध्ये पूर्णतः:बसले माञ त्यांच्या कर्जवसुली अगदी व्याजाचा सहित करण्यात आली माञ अनुदानरुपाने किंवा कर्जमाफी झाल्यानंतर या रक्कमा शेतकरी यांना दिसल्यावर अनेक कर्जदार यांनी आपल्या बँक स्टेटमेंट काढले माञ त्यावर रक्कमा जमा नसल्याचे दिसत आहे माञ शासनाच्या कर्जमाफी व अनुदान या यादीत अनेकांची नावे दिसत आहेत.मग कर्जमाफ झाले,अनुदान मिळाले तर या रक्कमा कोणाच्या घशात गेल्या याचा शोध आता सुरु झाला आहे.कोणाच्या आशीर्वादाने व संगमताने हा अपहार,घोटाळा झाला हे लवकरच सत्य पुराव्यानिशी थोड्याच दिवसात बाहेर येणार आहे.सहकाराकडुन समृध्दी शेतकरी यांची न होता कोणाची झाली हे आता लवकरच बाहेर पडणार नाही.साहय्यक निबंधक यांचे कार्यालय शेजारीच असुन सुध्दा या गोष्टीचा सुगावा कसा,कोणाला लागला नाही ही सुध्दा विचार करण्याची गोष्ट आहे.काही मंडळी यांनी वाच्यता होताच काही मंडळीनी रक्कम भरून आपला संबंधच नसल्याचा आविर्भाव आणला आहे माञ अपहार किती रुपयाचा निश्चित नसताना हे दहा लाख रुपये का भरून घेतले आहेत.असा सवाल आता कर्जदार,सभासद व खातेदार यांच्यात सुरु झाली आहे.आता या तक्रारी प्राप्त होत असुन अनेक शेतकरी व कर्जदार हे पुराव्यानिशी काही दिवसातच मिडियाच्या समोर या गोष्टी मांडणार असल्याच कळत आहे.
Comments
Post a Comment