अकोले-भंडारादरा धरणग्रस्त शेतकऱ्यांना पिण्याच्या पण्यासहित शेतीसाठी मोफत पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार- मारुती मेंगाळ

अकोले - उत्तर नगर जिल्ह्याची जीवन दायनी असलेल्या भांडारदरा धरण पूर्ण  क्षमतेने भरले आहे. या धरणाचे आज मा.उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले . भंडारदरा धरणाच्या एकूण पाणी साठ्या पैकी धरणाच्या मागील भाग ( बॅक वॉटर) करिता एकूण क्षेत्रासाठी 6. टक्के पाणी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेती साठी शेतकऱ्यांना उचलण्यासाठी राखीव  साठा उपलब्ध आहे मात्र या पाणी साठ्याचा पाहिजे तितका फायदा धरणाच्या मागील भागातील म्हणजे धरणग्रस्त शेतकऱ्यांना आज वर झालेला नाही.या शेतकऱ्यांना आदिवासी उपयोजनेचा पैसा खर्च करून धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात मोफत पाणी उपलब्ध करून देता येईल त्या साठी विधान सभा निवडणुकीनंतर मी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी देविदास खडके, लक्ष्मण  उघडे, सखाराम गांगड, प्रकाश उघडे, चंदर गांगड, बुवांजी गांगड,पोपट मेंगाळ, आनंद गिऱ्हे, मावांजी अगिवले, अजय भांगरे,राजू उघडे, शांताराम उघडे,उपस्थित होते.
भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आज मारुती मेंगाळ यांनी या धरणाचे जल पूजन केले.ते या प्रसंगी बोलत होते. भंडारदरा धरणाचा 11.039 TMC) इतका पाणी साठा आहे.या मधे समन्याई पाणी वाटप समितीचा जो कायदा झाला या मधे या भंडारदरा धरणाच्या कार्यक्षेत्रातील जी तालुके आहेत.त्या तालुक्यांना पाण्याचे वाटप झाले आहे या मधे भंडारदरा धरणाच्या   मागील भागासाठी 6 टक्के क्षेत्रासाठी पाणी राखीव आहे,अकोले तालुक्यासाठी , 18 टक्के , संगमनेर 22 टक्के,राहता श्रीरामपूर 52 टक्के ,नेवासा 3 टक्के ,राहुरी 5 टक्के  या प्रकारे पाणी वाटप झाले असून जवळपास 32 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाण्याचा  फायदा संगमनेर, राहता श्रीरामपूर,नेवासा ,राहुरी या तालुक्यांना जितका झाला तितका आपल्या अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला नाही.आजही आपल्या तालुक्यातील लाभ धारक क्षेत्रातील  शेतकरी आणि भंडारदरा धरणाच्या मागील भाग असलेल्या शेंडी,मुरशेत,पांजरे, उडदावणे,शिंगणवाडी, लव्हाळवाडी, घाटघर, सम्राद, रतनवाडी, कोलटेंभे,मुतखेल, भांडरदरा धरणग्रस्त शेतकरी तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला नाही. अकोले तालुक्यासाठी 18 टक्के  तसेच धरणाच्या मागील भाग साठी 6 टक्के असे एकूण 23 टक्के पाणी साठा असून त्यांचा उपयोग पाहिजे तितका होतांना दिसत नाही. भंडारदरा धरण या भागातील आदिवासी समाजाच्या त्यागातून कष्टातून उभे राहिले आहे.शेंडी, मूरशेत , पांजारे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, घाटघर, साम्राद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, भंडारदरा या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणात गेल्या आहेत. भंडारदरा धरण भरले की याचा फायदा  खालच्या भागातील कार्य क्षेत्रातील गावांना तालुक्यांना होतो.मात्र ज्यां आदिवासी बांधवांच्या जमिनी गेल्या.या धरणात गेल्या त्या आदिवासी बांधवणा आजही पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे.मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये या भागातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असून धरण उशाला आणि कोरड घशाला अशया प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असून या भागातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना या धरणातील त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे या साठी या आधीच प्रयत्न करणे गरजेचे होते.मात्र या धरणाच्या पाण्याचा फक्त राजकारणा पूर्ता उपयोग राजकीय नेत्यांनी केला.प्रतेक्षरीत्या या भागातील आदिवासी समाजातील नागरिकांना हे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणीच प्रयत्न केला.नाही. आज आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद दरवर्षी राज्य शासन,केंद्र शासनाकडून केली.जाते आदिवासी विभागाचा पैसा खर्च झाला नाही म्हणून अनेकदा हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाल्याचे वास्तव दर्श चित्र आपण पाहिले.आहे. अकोले तालुक्यात जी धरणे उभे राहिले आहे या मधे भंडारदारा, निळवंडे, पाडोशी,सांगावी, देवठाण,अंबित, पिंपळगाव खांड, चिल्हेंवाडी, या धरणाच्या हक्काच्या पाण्यासाठी आज वर संघर्ष झाला मात्र या सर्व धरणांमध्ये जो आपल्या तालुक्याचा हक्काचा राखीव पाणी साठा आहे. हे पाणी शेतकऱ्यांना कसे मिळेल या साठी कोणीच प्रयत्न केले नाही आजही या सर्व धरणाच्या कार्य क्षेत्रातील भाग व लाभ क्षेत्रातील तसेच  धरणग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना या धरणांमधील पाण्याचा फायदा जितका होयाला पाहिजे होता तो झाला नाही.
आज सर्वाधिक पाऊस भंडारदारा परिसरात पडत असतो. भंडारदारा धरणाच्या मागील भाग असलेल्या मुरशेत,पंजरे, उडदावणे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, घाटघर, साम्राद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल,या भागात सर्वाधिक पाऊस पडत असतो.या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून शेती पिकांसाठी जी पोषक माती असते ती काळी माती सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणात वाहून गेली आहे. शेत जमिनीमधे बारीक खडे,मुरूम ,सोडता पोषक काळी माती वावरणामध्ये राहिली नाही.त्या मुळे.भात पीक सोडता दुसरे मुख्य पीक या भागातील शेतकऱ्यांच्या घेता येत नाही.भात , नागली, वरई ,हे पिके सोडता इतर मुख्य उत्पन्नाच्या दृष्टीने जी महत्त्वाची पिके समजली जातात ती पिके.उद्या,कांदा,ऊस,सोयाबीन,टोमॅटो, मका,कोबी, फ्लॉवर,डाळिंब,या सहित आदी पिके घेता येत नाही.त्या मुळे या भागातील आदिवासी समाजाला शेती पिकांमधून जास्त उत्पन्न मिळत नाही.त्या मुळे.या भागातील शेतकरी कायम आथिर्क दृष्टया,सामाजिक दृष्ट्या  मागास राहत आला आहे.या भागातील आदिवासी बांधवांना शेती व्यवसायातून समृध्द करायचे असेल तर भंडारदरा धरणातील काळी माती जी वर्षानुवर्ष शेतजमिनिंमधून वाहून धरणात गेली आहे.ती मोफत काढून पुन्हा या सर्व वावरांमध्ये टाकली पाहिजे. जेणे करून या भागातील शेती मधे इतर चांगले पिके या भागातील शेतकऱ्यांना घेता येईल.त्याच प्रमाणे या धरणाचा 6 .टक्के जो पाणी साठा कायम शिल्लक आहे.त्याचा पुरे पुर वापर होण्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी उपयोजनेतून पैसा खर्च करून  या भागातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासहित शेती साठी मोफत पाणी देता येईल तो प्रयत्न येणाऱ्या काळात करणार असून विधानसभेच्या  निवडणुकीनंतर या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासहीत  शेती साठी मोफत पाणी देण्याचे माझे स्वप्न असून ते मी प्रयत्न करणार असल्याची भावना या वेळी त्यांनी व्यक्त केली,न्यूज सह्याद्री एक्सप्रेस उपसंपादक किशोर मोहिते अकोले

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..

पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प