पुञ शरद पवार गटात,आई भाजपात,कार्यकर्ते संभ्रमात,पदाधिकारी गप्प

अहिल्यानगर जिल्हात सध्या जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुक जाहीर होताच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राजकीय भूकंपाचे सावट दाटलेले आहे अकोले तालुक्यातील अनेक राजकीय नेते हे या पक्षातुन त्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे.काल पर्यंत विविध पक्षाची कट्टर विचारधारा सांगणारे कार्यकर्ते हे विचारधारेला फाट्यावर मारून विविध पक्षात स्थिरावताना दिसत आहे.अकोले तालुका हा डाव्या,उजव्या,कम्युनिस्ट चळवळीचा, विचारधारेचा तालुका म्हणुन आज पर्यंत ओळखला जायचा, माञ अकोले तालुक्यात सध्या सध्या राजकीय अस्तित्वासाठी अनेकजण विविध पक्षात स्थिरावताना दिसत आहे.महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार)गटाचे कार्यकर्ते हे आपण नेमके कोणत्या पक्षात आहोत?आज पर्यंत पवार साहेबांचे निष्ठावंत म्हणुन बी.जे.देशमुख,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे,तालुका अध्यक्ष सुरेश गडाख, आर.के.उगले,चंद्रभान नवले,बबनराव तिकांडे,राजेंद्र कुमकर,अभिजित वाकचौरे,संदिप शेणकर,विकास बंगाल,प्रदेश वर काम करणारे विनोद हांडे असे अनेक पवार कट्टर समर्थक अकोले तालुक्यात आहेत माञ त्यांच्या व पक्षाच्या विचारधारेला न जुमानता आपला एकतर्फी निर्णय घेत व आपला निर्णय लादत राष्ट्रवादी पवार पक्षाचे नुसकान करणाऱ्या अमित भांगरे यांची पक्षातुन हाकालपटटी करत नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी होत आहे अर्थात तशी मागणी तालुका अध्यक्ष म्हणुन सुरेश गडाख व इतर पदाधिकारी यांनी करणे गरजेचे होते,अलीकडेच नव जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक झालेले, जिल्हा वरिष्ठ पदाधिकारी संदीप वर्पे यांनी काल,परवा अकोले तालुक्यात आढवा बैठक घेतली माञ पक्षाची विचारधारा ओलांडुन भाजपात प्रवेश घेणा-या भांगरे कुटुंबियांवर कोणतेही भाष्य करताना दिसले नाही अर्थात त्यांनी भांगरे कुटुंबियांने घेतलेल्या विषयावर ताशेरे ओढणे गरजेचे होते, यामुळे अकोले तालुक्यात भांगरे कुटुंबियांना भाजप पक्ष प्रवेशाला नकळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन बळ मिळत आहे का?अशी चर्चा सध्या अकोले तालुक्यात सुरु आहे.माजी जिल्हा परीषद सदस्य व अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन सुनिताताई भांगरे यांनी मंञी राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला माञ प्रवेशाच्या अगोदर खुद्द त्यांचे पुञ अमित भांगरे व माजी आमदार वैभवराव पिचड हे विखे पाटिल यांच्या भेटी दरम्यान उपस्थित होते यामुळे युवानेते अमित भांगरे हे जर आपल्या मातोश्री असलेल्या सुनिताताई भांगरे यांच्या राजकीय भेटीच्या चर्चेसाठी उपस्थित राहत असतील तर अमित भांगरे यांचे नेतृत्व हे महाविकास आघाडीने मान्य का करावे असा विषय सध्या चर्चेत आहे.सध्या महायुतीतील घटक पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटात सतिशदादा भांगरे,मधुकरराव तळपाडे यांनी आमदार डाॅ.किरण लहामटे यांच्या सोबत जाणे पसंत केले माञ त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही पूर्वीच्या पक्षात थांबली नाही माञ आई एका पक्षात व मुलगा एका पक्षात अशी स्थिती असल्याने अकोलेकरांनी वारंवार पक्ष बदल करणा-या व्यक्तींच्या बाबतीत वेगळा विचार केला आहे.कोणत्याही कार्यकर्ते व कोणता ही कार्यकर्ता मेळावा न घेता, आपला विचार न मांडता जि.प.सदस्या सुनिताताई भांगरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.या पूर्वी आमदार किरण लहामटे हे पवार साहेबांना सोडुन गेले म्हणत आगपाखड करणारे अमित भांगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) जाहीर यांनी जाहीर पञकार परीषद घेत पञकार बांधवाच्या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक होते माञ आपली आईचा भाजप प्रवेश घडवुन देण्यात अग्रेसर असणारे अमित भांगरे हे उलट राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आढावा बैठका घेत आहेत.सुक्ष्मपणे पाहिले ते अमित भांगरे यांच्याकडुन महाविकास आघाडीने त्यांचे नेतृत्व काढुन घेणे अवश्यक होते माञ वरिष्ठ जिल्हाचे पदाधिकारी असलेल्या संदिप वर्पे यांनी त्यांना ताकद दिल्याचे समोर येत आहे यामुळे नव्यानेच अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे यांना शरद पवाराचा पक्ष अकोले तालुक्यात वाढवयाचा आहे की संपवयचा आहे हे कळायला मार्ग नाही.तसेच अकोले तालुक्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्ते यांनी अमित भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असणारे अमित भांगरे यांचा हाकालपटटीचा निर्णय करा हि मागणी घेऊन पुढे येऊन बोलणे गरजेचे असताना पदाधिकारी हे गुलाम असल्यागत गप्प आहेत यामुळे महाविकास आघाडी ही कच्चे उमेदवार देऊन भाजपाला जि.प व पंचायत समितीत जिंकुन देणार असल्याच चिञ दिसुन येत आहे यामुळे अकोले तालुक्यात महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट व महायुतीत नुरा कुस्ती होणार असुन आमदार किरण लहामटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्याची तयारी करत असुन गट व गणातील प्रचार व प्रसार यंञणा ही कामाला लागली आहे.या दरम्यान शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हे संभ्रमावस्थेत गेल्याचे चिञ समोर आले आहे,"विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती"अशी स्थिती महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी गटावर आली आहे. क्रमशः -भाग-१

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

अकोले-मार्च अखेरीस अगस्ती सह. साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या पदरी निराशाच-संदीप भाऊसाहेब शेणकर.