पक्षाचे तिकीट मिळो न मिळो भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी-कार्यकर्ते यांची मागणी

अकोले,ता.१०: पक्षाचे तिकीट मिळो न मिळो भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थकांनी धरल्याने अकोलेतील 'महायुती'तील विसंवादाचे तडे रूंदावणार असल्याचे संकेत अकोले महायुतीत पहायला मिळाले आहेत. दरम्यान, वैभव पिचड यांनी महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांवर टीकेचा भडिमार केल्याने मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता अधिक बळकट झाली.विविध क्षेत्रातील मान्यवर, समर्थक कार्यकर्ते, नागरिक यांचा देवठाण,कोतुळ येथे संवाद मेळावा पार पडला आहे.अध्यक्षस्थानी व्यापारी रामनिवास राठी होते. माजी आमदार वैभव पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती.अकोले तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत.आता आम्हाला आमची चूक सुधारायची असून आम्ही तुम्हाला आमदार करणारचं, त्यादृष्टीने तुम्हाला तिकीट मिळो अगर ना मिळो तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवावीच लागेल असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला.यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी विद्यमान आमदारांवर सडकून टीका केली. आमदारकीआधी विद्यमान आमदार भाजप सोडून राष्ट्रवादीत गेले. नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले. विकासकामांच्या नावाखाली  त्यांनी राजकीय पक्षांशी वारंवार गहारी केली. या पाच वर्षांत विद्यमान आमदारांनी असे कोणते काम केले की ज्यामुळे फायदा झाला? विकासनिधी देणाऱ्या महायुती सरकारचा यात कोणताच वाटा नाही का, असा सवाल त्यांनी केला.अतिवृष्टीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आणि त्यांचे आदिवासी दिन नको तेथे साजरा करण्याचे नियोजन सुरू आहे. आदिवासी दिन एकत्रित साजरा करण्यासंदर्भात मला फक्त मधुकर तळपाडे यांचा फोन आला होता.मी त्यांना स्पष्ट नकार दिला.आपण नेहमीप्रमाणे राजूर येथेच आदिवासी दिन साजरा करणार असल्याचे पिचड यांनी स्पष्ट केले.भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे, तालुका सरचिटणीस राहुल देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, रावसाहेब वाकचौरे, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, धनंजय संत, सोनाली नाईकवाडी, संदीप शेटे, प्रकाश नवले, शिवाजी आरज, शांताराम कोकणे, मधुकर बिबवे, अशोक भळगट, अनिल भळगट, नीलेश देशमुख, संतोष खांबेकर, खंडूबाबा वाकचौरे,नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, संतोष - कचरे, रामेश्वर रासने, रोहिदास धुमाळ, डॉ. रवींद्र गोर्डे, सचिन शेटे, किशोर काळे, तुषार सूरपुरिया, नगरसेवक सागर चौधरी, विजय पवार, हितेश कुंभार, परशुराम शेळके, नवनाथ न मोहिते, मोसिन शेख, रवींद्र शेणकर, फत्तू सय्यद, नाजिम - शेख, सुनीता मुंदडा, कल्पना सूरपुरिया, माधवी जगधणे, नगरसेविका वैष्णवी धुमाळ, शीतल वैद्य, प्रतिभा मनकर, कविता शेळके, माधुरी शेणकर, तमन्ना शेख आदी उपस्थित होते. शाहूनगर येथील नीलेश लांडगे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँगेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे यांनी केले, सूत्रसंचालन अमोल वैद्य यांनी तर आभार सरचिटणीस राहुल देशमुख यांनी मानले.न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..