टाकळी-शिवाजी तिकांडे सर व परिवाराकडून टाकळी शाळेस ब्ल्यूटुथ ट्राॅली स्पिकर संच भेट

*अकोले - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांतर्गत ७८ व्या स्वतंत्रता दिनाच्या निमित्ताने टाकळी गावचे भूमिपुत्र व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. शिवाजी तिकांडे सर व परिवाराकडून अकोले तालुक्याच्या देवठाण बीटातील जिल्हा परिषद टाकळी शाळेस ८००० रुपये किंमतीचा एक ब्ल्यूटुथ ट्राॅली स्पिकर संच भेट देण्यात आला.‌याप्रसंगी शाळा व गावाकडून श्री. शिवाजी तिकांडे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी स्वतंत्रता दिनाचे ध्वजारोहण व्यवस्थापनाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब फोडसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी गावचे माजी सरपंच श्री. रामहरी तिकांडे हे होते. यावेळी टाकळी गावातील ज्ञानेश्वर तिकांडे, अतुल तिकांडे, सौरभ मोरे, कल्पेश थोरात, ज्ञानेश्वरी दातखिळे, साक्षी फोडसे, दुर्गा बर्डे या विविध स्पर्धा परीक्षेत यशवंत आजी माजी विद्यार्थ्यांचा संयोजन समितीकडून सत्कार करण्यात आला.या समारंभात टाकळी शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या देशभक्तीपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधून शिवाजी तिकांडे सर व परिवाराने आपुलकीच्या शैक्षणिक मिशनची जपणुक केल्याबद्दल अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. अभयकुमार वाव्हळ, देवठाण बीट विस्तार अधिकारी श्री अनिल गायकवाड व टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांनी दात्यांचे अभिनंदन केले आहे. प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाकळी केंद्रशाळेचे शिक्षक श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले‌.उपसंपादक-किशोर मोहिते,न्यूज सह्याद्री एक्सप्रेस, अकोले

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..