अकोले-वाद जागेचा लेकराच्या डोळ्यावर दगड तर आई जखमी
अकोले नगरपंचायत हद्दीतील धामणगाव रोड येथील दत्तनगर परिसरात राहत असलेल्या शिंदे कुटुंबीयांवर मोठा अन्याय होत असल्याची दिसत आहे. रामदास शिंदे यांच्या घरानजिक कुठलीही बांधकाम परवानगी न घेता अनाधिकृतपणे एका महिलेने बांधकाम सुरू केले आहे या बांधकामामुळे शिंदे यांच्या घराची भिंत अनेक ठिकाणी कोसळली असून भविष्यकाळात या घराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे यासंदर्भातील तक्रार शिंदे कुटुंबीयांनी अकोले नगरपंचायत तसेच सह आयुक्त अहिल्यानगर, त्याचबरोबर नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना करून देखील आज तागायत सदर महिलेचे काम राजरोषपणे सुरू आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून सदर कुटुंब हे आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनाचे उंबरठे झीजवत आहे . परंतु या निगरगठ्ठ प्रशासनाला अद्यापही जाग येताना दिसत नाही अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये असंख्य अनाधिकृत बांधकामे झाली आहे आणि यावरच पडदा टाकण्यासाठी नगरपंचायत सदर बांधकामावर कुठलीही कार्यवाही करताना दिसत नाही. रामदास शिंदे यांची मुलगी निरुपमा प्रवीण देठे हिने आमचे घराचा पाईप का तोडता असे स...